शेती प्रक्रिया उद्योगाला सर्वतोपरी मदत : भुसे

पळसे येथे रसायनविरहित गूळनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
शेती प्रक्रिया उद्योगाला सर्वतोपरी मदत : भुसे

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

शेतकर्‍यांनी (Farmers) एकत्रित येऊन भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास आवश्यक ती सर्व मदत देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले...

पळसे (palse) येथील नासिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या गट शेती योजनेतून गूळ निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पाचे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे (Hemant Godse), आ. सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, संचालक दत्ता गायकवाड, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, मनसेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सरपंच सुरेखा गायधनी आदी उपस्थित होते.

यावेळी भुसे म्हणाले की, राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यायला हवा. नासिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीसारखे शेतकर्‍यांचे 1000 लघुउद्योग स्थापन करण्याचा संकल्प यावेळी भुसे यांनी व्यक्त केला.

नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याबरोबर सहकारमंत्री, उपमुख्यमंत्री व गरज भासल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. खा. गोडसे म्हणाले की, युवा शेतकर्‍यांनी पुढे येऊन प्रक्रिया उद्योग उभारल्यास आगामी काळात शेती व्यवसाय समृद्ध होणार आहे नाशिक तालुक्यातील सह्याद्रीप्रमाणेच गूळ प्रकल्प इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. गुळाचा झालं आता साखरेचे काय, असा सवाल नाशिक साखर कारखान्याबाबत खा. गोडसे यांनी उपस्थित करताच हंशा व टाळ्यांनी शेतकर्‍यांनी त्यांना प्रतिसाद दिला.

कंपनीचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांनी प्रास्ताविकात गूळ निर्मिती प्रकल्प उभारण्याची संकल्पना स्पष्ट केली. केमिकल विरहित गुळ निर्मिती होणार असल्याने ग्राहक व बाजारपेठ, उत्पादन विक्री निश्चितपणे चांगली होणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन कृषि विभाग महाराष्ट्र बँक व मदत करणाऱ्यांबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. आ. सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही नैसर्गिक गूळ प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास कृषी जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे राजेंद्र निकम, सुनील वानखेडे उपविभागीय अधिकारी गोकुळ वाघ, संजय सूर्यवंशी, कैलास शिरसाट, हेमंत काळे, महाराष्ट्र बँकेचे विजय कोब्रा, सागर खैरनार, कल्पना पाटील, वैशाली टिपरे, सुधाकर बडगुजर, संजय तुंगार, संचालक माणिकराव कासार, शिवराम गायधनी, दिलीप गायधनी, शरद टिळे, नीलेश सरोदे, सविता तुंगार, मुक्ता पाध्ये, कांचन बर्वे, जि. प. सदस्य शंकरराव धनवटे, प्रकाश म्हस्के, अरुण जाधव, श्रीराम गायकवाड, उज्ज्वला जाधव, राहुल ताजनपुरे, नवनाथ गायधनी, गणेश गायधनी, शरद गायधनी, राजाराम गायधनी, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com