
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
माजी आमदार धनराज महाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय व माजी आमदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धनराज महालेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ. सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, अजय बोरस्ते, नेवापूरचे सुकदेव महाराज, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी जिल्हाप्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते. शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नेते संपत घडवजे, बाळासाहेब मेधने, दत्तू पाटील, नंदू बोंबले, विश्वासराव देशमुख, अॅड. प्रदीप घोरपडे, भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे, नरेंद्र जाधव, प्रमोद देशमुख, राजेंद्र उफाडे, रणजित देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, बाळासाहेब दिवटे, सुकदेव पाटील,
हेमंत पगारे, योगेश बेर्डे, माधव उगले, वणीचे सरपंच मधुकर भरसट, माजी सरपंच किरण गांगुर्डे, करण गायकर, नीलेश शिंदे, नदीम सय्यद, सुनील जाधव, विशाल देशमुख, अभिजित गोजरे, सूरज राऊत, सोमनाथ वतार, आबा जाधव, सागर पगारे, सुभाष मेधणे, नीलेश भोये, तुषार गांगोडे, किरण कावळे, नदीम सय्यद, सुनील जाधव, नवनाथ महाले, पप्पू राऊत, सचिन कापसे, सिद्धार्थ साबळे, शेखर धात्रक, मुन्ना मणियार, राहुल गांगुर्डे, रवी जोपळे, सोनल जाधव, जहीर शेख, रोशन जाधव, जि. प. सदस्य भास्कर भगरे, डॉ. गोसावी, प्रवीण गांगुर्डे,
प्रताप देशमुख, भूषण सवंद्रे, प्रशांत राऊत, हरिष वाघमारे, संगम देशमुख, प्रभाकर जाधव, तुकाराम जाधव, उपसरपंच संजय ढगे, किरण कड, ओमकार निमसे, अनिल चौघुले, किरण देशमुख, कृष्णा देशमुख, नंदू गवळी, सागर पगारे, मयूर देशमुख, सुनील निमसे, भाऊ शिरसाट, किरण गांगुर्डे, संतोष खैरनार, नानू मनियार, मानू पाटील, प्रताप देशमुख, अॅड. उगले, लक्ष्मण गायकवाड, प्रभाकर वडजे, शाम बोडके, कैलास पाटील, गणेश हिरे, सुनील पाटील, एकनाथ डंबाळे, रोहिदास पाटील, कचरू पाटील, पिंटू पवार, मधुकर पवार, साहेबराव गाढे, गणेश पवार, यांच्यासह धनराज महालेंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अमोल कदम, शहरप्रमुख सुरेशशेठ देशमुख व युवानेते वैभव धनराज महाले यांनी केले.
मुख्यमंत्र्यांकडून महालेंना शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून माजी आमदार धनराज महाले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व पक्ष कार्यालयासाठी शुभेच्छा देऊन हे पक्ष कार्यालय सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्कात असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचार
धनराज महाले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने दिंडोरी मतदारसंघात शिंदे गटाला उभारी मिळणार असल्याचे बोलले जात होते. परंतु आज वाढदिवसानिमित्त झालेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व असंख्य कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यातून वाढदिवसानिमित्त विधानसभेचे रणशिंग शिंदे गटाकडून फुंकले गेल्याचे दिसून आले. यावेळी सकाळपासून कार्यालयावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. कार्यक्रमाला महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती व मुख्यमंत्र्यांचा आलेला फोन यातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झालेली दिसते. येणार्या विधानसभा निवडणुकीत धनराज महालेंना आमदार करायचे असा निश्चिय कार्यकर्त्यांनी यावेळी केला.