वाळीपाड्यात जलयोजनेचे लोकार्पण

वाळीपाड्यात जलयोजनेचे लोकार्पण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील( Trimbakeshwar Taluka ) खरशेत ग्रामपंचायत ( Kharshet Grampanchayat)अंतर्गत असलेले दुर्गम वाळीपाडा( Walipada) येथे सोशल नेटवर्क फोरम औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेच्या सैन्याधिकारी माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदानातून उभारललेल्या जलयोजनेचे लोकार्पण कर्नल प्रसाद कदम, निवृत्त विंग कमांडर मनीष निगडे, एसपीआयचे संचालक कर्नल अमित दळवी, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपसरपंच भास्कर भोबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कर्नल दळवी, कर्नल कदम, विंग कमांडर निगडे, इंजि प्रशांत बच्छाव , संदिप बत्तासे , रामदास शिंदे , डॉ. निलेश पाटिल, राघो राऊत, उत्तम राऊत, सीता राऊत, सुमन भोंबे, रामदास राऊत, भिवा राऊत, शंकर राऊत, मुख्याध्यापक धंनसिंग महाले, राजाराम बहिरम जिल्हा परिषद शाळा केंद्र खरशेत येथील शिक्षक तसेच वाळीपाडा ग्रामस्थ उपस्थित होते.

राकेश दळवी यांनी आदिवासी दुर्गम भागात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार्‍या सोशल नेटवर्किंग फोरमची माहिती त्यांना दिली.गावकर्‍यांनी या प्रसंगी पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या तालावर नृत्याचा ठेका धरत पाहुण्यांचे स्वागत केले. पाण्याने भरलेल्या कलशांची मिरवणूक काढून ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. गावातील ज्येष्ठ महिला आणि पाहुण्यांच्या हस्ते नळाच्या तोट्या उघडून जलयोजनेचे लोकार्पण झाले. आमच्या थोड्या मदतीमुळे वाळीपाड्यात पाणी पोहोचल्याचा आनंद युद्ध जिंकण्याइतकाच आहे, असे मत कर्नल प्रसाद कदम यांनी व्यक्त केले.

तर 21 व्या शतकातही एखाद्या गावाला पाण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात हे कळले तेंव्हा वाईट वाटले. त्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रयत्नात साथ देण्याचा मनोदय होता. तो पूर्ण करण्यात आल्याचे प्रतिपादन कर्नल अमित दळवी यांनी केले. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणार्‍या सैन्याधिकार्‍यांनी अशा रीतीने एका गावाला जलमय करून आपल्यातील माणुसकीचे घडवलेले दर्शन ही संपूर्ण आदिवासी परिसरात चर्चेची बाब ठरली .

आज वाळीपाड्यात प्रत्यक्ष गेल्यावर कळले की या लोकांचे जीवन किती कष्टप्रद आहे. गावात पाणी आल्याने या लोकांच्या चेहर्‍यावर जो आनंद पाहिला तो आयुष्यभर लक्षात राहील.

मनीष निगडे, विंग कमांडर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com