सावता नगर येथे ६५ खाटांच्या कोवीड सेंटरचे शनिवारी उद्घाटन

राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन
सावता नगर येथे ६५ खाटांच्या कोवीड सेंटरचे शनिवारी उद्घाटन

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नवीन नाशकातील सावता नगर येथील सावरकर हॉल येथे सुरु होत असलेल्या कोवीड सेंटरचे शनिवार (दि.17 ) उद्घाटन राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी दिली.

नवीन नाशकात अद्याप मनपाचे कोवीड सेंटर नसून नवीन नाशिककरांना बाधीत आढळल्यास डॉ. झाकीर हुसेन व बिटको रुग्णालयात दाखल करावे लागत होते. यामुळे बाधित रुग्णांची तसेच नातेवाईकांची खूपच धावपळ होत होती.

नवीन नाशिककरांचा प्रश्न लक्षात घेत बडगुजर यांनी प्रभाग क्र. २५ मधील सावरकर हॉल येथे ६५ खाटांचे कोवीड सेंटर अवघ्या ४ दिवसात उभारले आहे. या कोविड सेंटर मध्ये ४४ ऑक्सिजन तसेच २१ साधारण रुग्णांसाठी बेड असणार आहेत.

तसेच या ठिकाणी वातानुकूलिन अतिदक्षता विभाग देखील असणार आहे. मनपा व खाजगी डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी हे कोविड सेंटर विनामूल्य उपलब्ध होणार असून याठिकाणी डॉक्टर, नर्स, वार्डबाय असा एकूण ३५ लोकांचा स्टाफ २४ तास उपलब्ध असणार आहे.

तसेच खाटांची कमतरता भासल्यास पुढील आठवड्यात रायगड चौक येथील मनपा शाळेत १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून नवीन नाशिककरांनी याठिकाणी सुरू होत असलेल्या कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक बडगुजार यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com