उमराळे गटात आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये रस्सीखेच

उमराळे गटात आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये रस्सीखेच

दिंडोरी | संदीप गुंजाळ | Dindori

तालुक्यातील जिल्हा परिषद (zilha parishad) गटामध्ये उमराळे बु. (Umrale) गट हा देखील महत्त्वाचा गट मानला जातो. काँग्रेस (congress), राष्ट्रवादी (Nationalist Congress), शिवसेना (shiv sena), भाजप (BJP) या चारही प्रमुख पक्षांनी या गटाचे नेतृत्व केले आहे.

आतापर्यंत या गटात अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) व इतर मागासप्रवर्ग हे आरक्षण (Reservation) पडलेले आहे. यावेळी सर्वसाधारण होईल, या आशेने इच्छुक उमेद्वारांची संख्या वाढलेली आहे. या गटात कोणत्या पक्षाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

1992 ते 1997 मध्ये दशरथ कराटे तसेच 1997 ते 2007 पर्यंत संजय शिंगाडे यांनी उमराळे गट काँग्रेसकडे ठेवला होता. त्यानंतर 2007 साली श्रीपत चौधरी यांच्या रुपात शिवसेनेने या गटावर कब्जा केला. परंतू काही महिन्यातच श्रीपत चौधरी यांचे अकाली निधन झाले. नंतर झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) प्रकाश वडजे यांनी येथे बाजी मारली. त्यानंतर 2012 च्या निवडणूकीत (election) इतर मागासप्रवर्गातून महिला राखीव झाल्याने येथे भाजपचे नेते शाम बोडकेे यांच्या सौभाग्यवती मनिषा बोडके यांनी या गटाचे नेतृत्व केले.

2017 साली काँग्रेसकडून माजी आमदार रामदास चारोस्कर (Former MLA Ramdas Charoskar) यांच्या सौभाग्यवती सुनीता चारोस्कर यांनी या गटाचे नेतृत्व केले असून यावेळी त्यांनी समाजकल्याण सभापतीपदही भुषविले आहे. एकुणच या गटाने चारही प्रमुख पक्षांना संधी दिली असून या यंदाचे नेतृत्व कोणत्या पक्षाकडे असणार ही येणारी वेळच ठरवणार आहे. या गटात इच्छुक उमेद्वारांची संख्या जास्त असून प्रमुख पक्षांच्या मात्तबरांना निवडणूकीचे (election) वेध लागले आहे. आरक्षण काही निघाले तरी मात्तबर आपल्या मर्जीच्या उमेद्वारांना संधी देवून प्रतिष्ठा पणाला लावतील यात शंका नाही

या इच्छुक उमेद्वारांमध्ये पंचायत समिती (panchayat samiti) सदस्यांना जिल्हा परिषद (zilha parishad) वारीचे वेध लागलेले दिसत आहे. आजी माजी पंचायत समिती सदस्यांमध्ये या गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीला नशीब आजमावण्यासाठी रस्सीखेच जोरदार सुरु असल्याचे चित्र आज दिसत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्यही पुन्हा एकदा या गटाची नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले असले तरी उमराळे गटात वर्णी कुणाची लागणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

त्याचबरोबर राजकारणात नव्यानेच प्रवेश करणार्‍या नवयुवक व गटातील काही सरपंचांनाही जिल्हा परिषद निवडणूकीचे वेध लागले असले तरी पक्षश्रेष्ठी कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. एकुणच जिल्हा परिषद निवडणूकीसाठी उमराळे गट सज्ज झाला असून सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते व इच्छुक उमेद्वार विजयाचे गणित मांडत यावेळी आमचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त करीत आहे. परंतू आरक्षण निघाल्यावर कुणाची बत्ती गुल होणार व कुणाला संधी मिळणार आणि मतदार कुणाला पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पक्षनिहाय चर्चेत असलेले इच्छुक उमेदवार (आरक्षणानुसार उमेद्वारात बदल होवू शकतो.)

  • राष्ट्रवादी काँग्रेस : प्रकाश वडजे, शाम हिरे, नरेंद्र पेलमहाले, मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब पाटील, सुनील पेलमहाले, राजू खांदवे, हर्षदा गावंडे, शशीकांत गामणे, गोपीनाथ गुंड

  • शिवसेना : सुनीता चारोस्कर, कैलास पाटील, विठ्ठलराव अपसुंदे, वसंतराव थेटे, गणेश हिरे, किशोर अपसुंदे, बालाजी पवार, राकेश शिंदे, संजय बोडके

  • काँग्रेस : वाळू जगताप

  • भाजप : शामराव बोडके, प्रभाकर वडजे, सुनील केदार, रघुनाथ गामणे

  • रिपाइ : अमित गवारे

जि.प.त पद भूषवलेले पदाधिकारी

2014 ते 2017 या कार्यकाळात या गटातील प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बांधकाम समिती सभापती हे पद भूषवलेले आहे. यावेळी ते अहिवंतवाडी गटातून निवडून आले होते. त्यांनी आरक्षणानुसार संधी मिळाल्यास उमराळे बु. गटातून उमेद्वारी करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच 2014 ते 2017 या कार्यकाळात समाजकल्याण सभापती म्हणून सुनीताताई रामदास चारोस्कर यांनी काम बघितले. त्यांनी 2017 ते 2022 या साली उमराळे गटाचे नेतृत्व केले. आरक्षणानुसार संधी मिळाल्यास त्या पुन्हा उमराळे गटाची उमेद्वारी करण्यासाठी इच्छुक आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com