जिल्ह्यात मागील चोवीस तासात 5 हजार 385 रूग्ण करोनामुक्त

उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये 4 हजाराची घट ; आज 38 बळी
जिल्ह्यात मागील चोवीस तासात 5 हजार 385 रूग्ण करोनामुक्त

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात सातत्याने करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत घट येत आहे. आज पुन्हा या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात 2 हजार 187 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात त्याच्या दुप्पट 5 हजार 385 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 27 हजार 312 चा आकडा पार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजाराची घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दिवसभरात 2 हजार 187 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे होणार्‍या रूग्णांपेक्षा पॉझिटिव्हचा आकडा तब्बल दुपटीने कमी आहे. दरम्यान मृत्युचे प्रमाण मात्र कायम असून आज 38 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 187 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 1 हजार 546 इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील 620 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात केवळ 6 रूग्ण आढळले तर जिल्हा बाह्य 15 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 5 हजार 81 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 60 हजार 106 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये घट झाली असून आज जिल्ह्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 30 रूग्ण आहेत, नाशिक शहरातील 7 तर मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 935 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 1 हजार 989 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 1 हजार 721 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये तब्बल 4 हजाराने घट आली असून हा आकडा आता 28 हजार 859 इतका झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,60,106

* नाशिक : 2,11,879

* मालेगाव : 11,964

* उर्वरित जिल्हा : 1,31,182

* जिल्हा बाह्य ः 5,081

* एकूण मृत्यू: 3,935

* करोनामुक्त : 3,27,312

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com