जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६२ रुग्णांची करोनावर मात

दिवसभरात १६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात मागील चोवीस तासात १६२ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १६२ रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १६० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या ८५ इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील ६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ८ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य १ रुग्णांची नोंद झाली आहे .

जिल्ह्यात आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील ५ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील १३ व जिल्हा बाह्य १ रुग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ५ हजार ५८७ इतका झाला आहे.

आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु - 214

(नाशिक मनपा-127,मालेगाव मनपा- 01,नाशिक ग्रामीण-78,जिल्हा बाह्य- 08)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com