जिल्ह्यात मागील चोवीस तासात १००३ रुग्णांची करोनावर मात

दिवसभरात ६७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; २९ बळी
जिल्ह्यात मागील चोवीस तासात १००३ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. आज पुन्हा पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात ६७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १००३ रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आज २९ रूग्णांचा मृत्यू झाला. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. मात्र त्या तुलनेत मृत्युचे प्रमाण ग्रामिण भागात अधिक आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ६७० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या २३४ इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील ४०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ११ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य २४ रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील २० रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ८ व मालेगाव येथील १ रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ४ हजार ६६६ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.