कडवाच्या बैठकीत शेतकर्‍यांनी वाचला तक्रारींचा पाढा

कडवाच्या बैठकीत शेतकर्‍यांनी वाचला तक्रारींचा पाढा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

कडवा कालव्याचे (kadva canal) आवर्तन सुटल्यानंतर महिन्यानंतरही कालव्याचा शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करीत सिन्नरच्या (sinnar) पूर्व भागातील शेतकर्‍यांनी (farmer) समस्यांचा पाढा वाचला.

आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या अध्यक्षतेखाली कडवा कालवा आवर्तन सोडण्याबाबत सिन्नरच्या शेतकर्‍यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात बोलविण्यात आली होती. पाटबंधारे विभागाचे (Irrigation Department) कार्यकारी अभियंता सागर शिंदे (Executive Engineer Sagar Shinde), धरण शाखा अभियंता नितीन मुठाळ, शाखा अभियंता विजय मोगल, घन:शाम भोई व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

आवर्तन सोडल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी गस्त घालावी, डोंगळे काढण्याची लुटपूटीची कारवाई न करता प्रत्यक्षात डोंगळे काढावेत, पुतळेवाडीपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करावी, पाणी मागणीचे अर्ज भरल्यानंतर पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत, पाण्याची गळती रोखावी, पाणी चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत आदिंसह पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या विरोधातील तक्रारी व समस्यांचा पाढाच वाचला

वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर, माणिकराव खुळे, दगू चव्हाणके, सोपान वायकर, मधुकर गिते, अण्णा डुंबरे, ाहुल खुुळे, अशोक खुळे, केशव कोकाटे, सुरेश खुळे, अण्णा डुंबरे, गणेश खुळे, उमेश खुळे, संतू डुंबरे, संजय घुले, भागवत डुंबरे, सोमनाथ कोकाटे, संजय नवले, गोविंद नवले, रोहिदास नवले, बहिरु कोकाटे यांच्यासह पुतळेवाडी, वडांगळी, उजनी, खडांगळी, कोमलवाडीचे लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

तर निलंबनाची कारवाई...

पाटबंधारे विभागाचे अधिकारी खोटे बोलतात. पाटाची दुरुस्ती व लेव्हलची कामे करण्यात आली नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तेव्हा आमदार कोकाटे संतप्त झाले. मी इतका निधी आणूनही कामे होत नसतील तर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. दोन दिवसात पाट दुरुस्तीचे काम पूर्ण करा, मी स्वत: येऊन पाहणी करतो. कामे पूर्ण झाली नाहीत तर अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे ते म्हणाले.

1 जानेवारीला आवर्तन सुटणार

पाण्याअभावी शेतातली उभी पिके जळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला असल्याकडे शेतकर्‍यांनी लक्ष वेधल्यानंतर 1 जानेवारीला पाणी सोडण्याच्या निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे आवर्तन महिनाभर चालू शकते. वडांगळी यात्रेच्यावेळी दुसरे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com