हिवरगाव उपबाजारात आ. कोकाटेंच्या हस्ते टोमॅटो लिलाव सुरू

हिवरगाव उपबाजारात आ. कोकाटेंच्या हस्ते टोमॅटो लिलाव सुरू

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील हिवरगाव (Hivargaon) येथील उपबाजारात नुकताच आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या हस्ते टोमॅटो (tomato) खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

टॉमेटो शेतमालाचा हंगाम सुरु असल्याने बाजार समितीने हिवरगाव उपबाजारात (Hivargaon sub market) प्रत्यक्ष शेतमालाची खरेदी-विक्री सुरु करण्याची मागणी शेतकर्‍यांनी (farmers) केली होती.

हिवरगांव हे सिन्नर (sinnar) व निफाड (niphad) तालुक्याच्या सरहद्दीवर येत असल्याने पंचक्रोषितील शेतकरी बांधवांना शेतमाल विक्रीसाठी जवळच्या मार्केटची सुविधा उपलब्ध नसल्याने याठिकाणी टोमॅटो खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यामुळष शेतकर्‍यांचा वेळ, श्रम व पैसा वाचणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली.

यावेळी सरपंच रत्नाबाई माळी, बाळु पोमनर, रावसाहेब दिवे, मुरर्लीधर माळी, संतोष पोमनर, अजय आव्हाड, योगेश घोटेकर, बाजार समितीचे सचिव विजय विखे, सहसचिव राजेंद्र जाधव, अशोक शिंदे, ज्ञानेश्वर तांबे उपस्थित होते. टोमॅटो खरेदीसाठी प्रविण चव्हाणके, आलाउद्दीन पटेल, प्रभाकर हारक, अनिल हारक, नाना खरात, प्रमोद यादव, राहुल गडगे यांच्यासह अनेक व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचा माल खरेदी केला.

हिवरगाव उपबाजारात सोमवार ते रविवार दुपारी 2 ते 7 वाजेपर्यंत टॉमेटो खरेदी केले जाणार असून शेतकर्‍यांनी आपला टोमॅटो प्रतवारी करुन 22 किलो वजनासह क्रेटसमध्ये विक्रीसाठी आणण्याचे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com