पहिल्याच पावसात गोदामाईत मिसळले गटारीचे पाणी

पहिल्याच पावसात गोदामाईत मिसळले गटारीचे पाणी

पंचवटी । प्रतिनिधी Nashik / Panchavati

शेकडो रुपये खर्च करून पावसाळी गटार योजना प्रकल्प (Rainwater Drainage Project) राबवण्यात आला. मनपा व स्मार्ट सिटी तर्फे ( NMC & Smart City ) या पावसाळ्यात गटारीचे पाणी गोदावरीत येणार नसल्याचा दावा फोल ठरला. गंगापूर धरणातून कुठल्याही पाण्याचा विसर्ग न होता पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरमापक दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वर पाणी आले आहे. हे सर्व पाणी गंगापूर रोड पासून शरणपूर रोड, बापू बंगला, रामवाडी पुलाजवळून, चोपडा लॉन्स ,मेरी ,म्हसरूळ या ठिकाणाहून गोदावरीत येत असल्याचे दिसून आले.

या पाण्यात अनेक गटारी ओव्हर फ्लो झाल्याने त्यांचे पाणी गोदावरीत आले त्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.गंगापूर धरणातून पाणी सोडले तर या पुराचे महापुरात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असे नदीकाठचे नागरिक म्हणाले. या पुराचे पाणी म्हणजे शाळेत शिकवले गेले की पाण्याला रंग व वास नसतो. मात्र या गटारी पुराला रंगही आणि दुर्गंधही असल्याचा प्रत्यय गंगा घाटावर पूर बघण्यासाठी आलेल्या बघ्यांना आला. एकीकडे पावसाची संततधार सुरु असताना गोदाकाठी असलेल्या चेम्बर्सचे ढापे उघडल्यामुळे हजारो लिटर गटारीचे पाणी गोदावरीत मिसळले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली.

नाशिकमध्ये दुपारपर्यंत 40.8 मिलीमिटर पाऊस झाला आहे. नेहमीप्रमाणेच पहिल्या पावसात गटारीच्या पाण्याचा पूर गोदावरीला आलेला दिसून आला. स्मार्ट फरशा गोदातीरी बसविण्यात आल्यामुळे येथील पात्र पाच ते सहा इंचांनी वाढले.उंच झाले आहे.फतुम्ही शेकडो कोटी खर्च केला. पण ग्राउंडवर झिरो रिझल्ट, तोच बर का नेहमीचा पावसाळ्यातील गोदावरीला आलेला पहिला गटारीचा पूरफ असे म्हणत पर्यावरणप्रेमींनी स्मार्ट सिटी कंपनीवर पुन्हा एकदा रोष व्यक्त केला.

दरम्यान, याच वेळी सोमेश्वर धबधबाही खळाळून वाहिल्याने हौशी लोकांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला,.

खरीप हंगामाला लाभदायक पाऊस

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे या भागाला विशेषता त्रंबकेश्वर,इगतपुरी, सुरगाणा, पेठ या भागातील भाता आवणी करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाने अल्प प्रमाणात का होईना कमी अधिक सर्वदूर हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातीळ पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीचे संकट यामुळे टाळणार आहे. जिल्ह्यात यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी शेतकर्‍यांनी उपलब्ध ओलीवरच करून घेतली होती. मात्र, पेरण्या पूर्णत्वाकडे येऊ लागत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र, आता दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात रिमझिम पावसाने का होईना हजेरी लावल्यामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी बाजरी मका सोयाबीन आदी पिकांची तसेच कडधान्याची पेरणी केली होती, ती सर्व पिके आता या पावसामुळे उतरून पडणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com