पंचवटी विभागात 'या' दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद

पंचवटी विभागात 'या' दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी विभागातील (Panchavati division) आर.पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनीस पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील (Panchvati Water Purification Centre) आवारात क्रॉस कनेक्शन (Cross connection) करण्यात येणार असल्याने

सोमवारी संध्याकाळी पाणी पूरवठा (Water supply) बंद राहणार आहे. त्यामुले मंगळवारी सकाळी कमी दाबाने पाणी पूरवठा केला जाणार आहे. पंचवटी विभागातील आर.पी.जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ उभरणी काम सोमवारी (दि.23) हाती घेण्यात येणार असल्याने पंचवट परिसराला सोमवारी पाणी पूरवठा होणार नाही. त्यामुळे नागरीकानी सावधानता बाळगण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

यामुळे पंचवटी परिसरातील आर.पी.जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन प्रभाग क्रमांक 4, 5 व 6 मधील जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर.पी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर,

गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडवरिल लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रीमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमान वाडी, चौधरी मळा, तुळजा भवानी नगर आदी परिसरातील पाणी पूरवठा सोमवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच मंगळवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नगरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com