नाशिकरोड विभागात रुग्णवाढीचा वेग तिप्पट
नाशिक

नाशिकरोड विभागात रुग्णवाढीचा वेग तिप्पट

पाच विभागात रुग्णवाढ दुपटीजवळ

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात जुन पासुन सुरू झालेला करोना संसर्गाचा वेग जुलै महिन्यात प्रचंढ वाढला असुन तेरा दिवसात २ हजार ४७ रुग्णांची भर पडल्याने शहरातील रुग्णांचा आकडा ४ हजार २१० पर्यत गेला आहे. शहरातील सहा विभागनिहाय रुग्णांची वाढ लक्षात घेता नाशिकरोड विभागात सर्वाधिक अशी तिप्पट रुग्ण वाढ झाली आहे. नाशिकरोड विभागात प्रामुख्याने मुंबईतील बाधीताच्या संपर्काचा मोठा परिणाम दिसुन आला आहे. उर्वरित पाच विभागात दुप्पट आणि दुपटीच्या पुढे रुग्णांची वाढ झाली आहे.

शहरातील करोना संक्रमणाचा मोठा वेग असल्याचे आता वाढत असलेल्या आकडीवारीवरुन दिसुन येत आहे. नाशिकरोड हा विभाग मुंबई व पुणे याठिकाणाहून येणारा रेल्वे मार्ग व राज्यमार्गाला जोडलेले भाग असल्याने लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाग्रस्त भागातून लोक आले. तसेच नाशिकरोड भागाचा मुंबईसह इतर शहराला असलेला संपर्कामुळे येथून अनेक नागरिक इतर शहरात जाऊन परतले. याचा परिणाम करोना संसर्ग वाढला असल्याचे समोर आले आहे.

नाशिकरोड विभागात एप्रिल - मे महिन्यात बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण होते. मात्र जुन महिन्यात रुग्ण संख्या वाढत गेली. ६ एप्रिल ते ३० जुन पर्यंत या विभागात १६८ रुग्ण होते. नंतर मात्र याभागात अनेक हॉटस्पॉट तयार झाले असुन आता जुलै महिन्यातील तेरा दिवसात याठिकाणी आत्तापर्यत याठिकाणी ६५६ रुग्ण झाले आहे. केवल जुलै महिन्यातील तेरा दिवसात ४८८ रुग्णांची भर पडली असुन तेरा दिवसात नाशिकरोडची वाढ तिप्पट झाली आहे.

शहरात हॉटस्पॉट बनलेल्या नाशिक पुर्व व पंचवटी विभागात जुन महिन्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असुन या दोन्ही भागात झोपडपट्टी भाग परिसर व कॉलनी अशा ठिकाणी नागरिकांना याची मोठी झळ बसली आहे. याठिकाणी वाढते संक्रमण लक्षात घेत आता या दोन्ही भागात पुन्हा एकदा जनता कर्फ्यु व प्रशासनाचा बंद अशाप्रकारे साखळी तोडण्यासाठी दोन्ही उपाय योजना केल्या जात आहे.

विविध उपाय योजनांनंतर आता जुने नाशिक भागातील रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. ३० जुन पर्यत नाशिक पुर्व विभागात ७२० रुग्ण होते. जुलैच्या तेरा दिवसात यात ५०३ इतक्या रुग्णांची भर पडल्याने याठिकाणची रुग्ण संख्या १२२३ इतकी झाली आहे. त्यानंतर पंचवटी विभागात ३० जुन रोजी ६३० करोना रुग्ण असतांना यात जुलैच्या १३ दिवसात ५४२ इतक्या रुग्णांची भर पडली असुन ही वाढ दुप्पट होण्याच्या जवळ गेली आहे. तसेच नाशिक पश्चिम व नवीन नाशिक याठिकाणी गेल्या दिवसात रुग्ण दुप्पट झाले आहे. अशाप्रकारे जुलै महिन्याच्या दोन आठवड्यात रुग्णांत लक्षणिय वाढ झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com