मालेगाव मनपात 'नो व्हॅक्सीन नो एन्ट्री'

मालेगाव मनपात 'नो व्हॅक्सीन नो एन्ट्री'

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाचे (corona) संकट अद्याप टळलेले नाही अशातच ओमायक्रॉनचा (Omycron) धोका वाढत आहे. मात्र शहरातील लसीकरणाची (vaccination) कमी असलेली टक्केवारी निश्चितच चिंताजनक आहे. करोना प्रादुर्भाव (Corona outbreak) रोखण्यासाठी नगरसेवकांसह नागरीकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh), आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारपासून शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये (Government, semi-government offices), प्रमुख बाजार आस्थापना (Market Establishment), शॉपिंग मॉल (Shopping mall) तसेच सार्वजनिक ठिकाणी दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या निर्णयाची कठोरतेने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयुक्त गोसावी यांनी स्पष्ट केले.

करोना प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे लसीकरण अभियान (Vaccination campaign) हाती घेण्यात आले आहे. मात्र सातत्याने जनजागृती करण्यात येवून देखील लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात 5 लाख 7 हजार 770 लसीकरणाचे उद्दीष्ट असतांना फक्त 2 लाख 24 हजार 833 जणांनी पहिला डोस तर 64 हजार 787 नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकुण 2 लाख 89 हजार 720 नागरीकांनी लसीकरण केले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली.

मनपाच्या अनेक नगरसेवकांनी अद्याप लसीकरण केलेले नाही. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी स्वत: लस घेत प्रभागातील नागरीकांना देखील लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, असे आवाहन करत महापौर ताहेरा शेख यांनी लसीकरण सुरक्षित असल्याने या संदर्भात पसरविल्या जात असलेल्या अफवांकडे लक्ष न देता स्वत:सह कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com