सीएनपी नोट प्रेसमध्ये इ-पासपोर्टचे इन-ले चिप दाखल

भारताच्या 5 हजार कोटी, नेपाळच्या 350 कोटी नोटांची ऑर्डर
सीएनपी नोट प्रेसमध्ये इ-पासपोर्टचे इन-ले चिप दाखल

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

नाशिकरोडच्या (Nashik Road) आयएसपी (ISP) व सीएनपी प्रेस (CNP Press) देशाचे मुकूटमणी आहेत.

सीएनपी प्रेसला यंदा नेपाळच्या (Nepal) 430 नोटा तर भारताच्या पाच हजार कोटी छपाईची अगडबंब ऑर्डर मिळाली आहे. आयएसपीला (ISP) भारताचा पहिला ई - छापण्याचा बहुमान मिळाला आहे. ई- पासपोर्टच्या (E-passport) 75 लाख इन-ले चिप (In-lay chip) प्रेसला मिळाल्या आहेत.

सन 1962 मध्ये नोटांसाठी नाशिकरोडला स्वतंत्र सीएनपी नोट प्रेस (CNP Note Press) सुरु झाली. तेथे एक रुपयांपासून पाचशेपर्यंतच्या भारतीय नोटा छापल्या जातात. प्रेसने 1948 मध्ये पाकिस्तानच्या (pakistan) तर 1940 मध्ये चीनच्या (china) नोटा छापून दिल्या. पूर्व आफ्रिका, चीन, इराण, भुतान, श्रीलंका, इराक, नेपाळ आदी देशांच्या नोटांची तसेच हैद्राबादच्या निझामाची नोटाही छापून दिल्या आहेत.

2007 साली नेपाळच्या नोटा छापल्या होत्या. यंदा पुन्हा 350 कोटी नोटा छापण्याची आर्डर नेपाळने (nepal) दिली असून कामगार रात्रीचा दिवस करून हे काम करत असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. 350 कोटी नोटांखेरीज भारतीय रिझर्व्ह बॅँकेने (Reserve Bank of India) नाशिकरोडच्या प्रेसला या आर्थिक वर्षासाठी पाच हजार कोटी इतक्या प्रचंड नोटा छापण्याची आर्डर दिली आहे.

त्यामध्ये वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटांचा समावेश आहे. काम वेगात होण्यासाठी जपानी तंत्रज्ञांनी अऩेक महिने परिश्रम घेऊन जपानी मशिन लाईन उभी केली आहे. एका लाईनमध्ये चार मशिन्स त्या नोटांचे कटिंग, छपाई, पॅकिंग एकाचवेळी करतात. सिंगलच्या दोन नवीन मशीन मार्चमध्ये तर ऑफसाईड प्रिटिंगच्या चार मशिन्स एप्रिलमध्ये येणार आहेत. त्यामुळे नोट प्रेस आगामी काळात विक्रम करणार आहे.

आयएसपी प्रेसमध्ये सध्या मद्याच्या बाटलीचे लिकर सिल, निवडणुकांचे इलेक्शन सील, ज्युडिशयल व नॉन ज्युडिशल स्टॅम्प्स, पोस्टल व रेव्हेन्यू स्टॅम्पस, स्टॅम्प पेपर्स, बँकांचे चेक्स छपाई सुरु आहे. भारतात पासपोर्ट फक्त या प्रेसमध्येच छापतात. ब्रिटिश काळापासून पासपोर्ट छपाई सुरु झाली. आतापर्यंत वीस कोटी पासपोर्टची छपाई प्रेसने केली. आता जगातील 70 टक्के देशांप्रमाणेच भारताचा ई पासपोर्ट छापण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ते आव्हान प्रेसने स्वीकारत चाचणी तत्वावर ई पासपोर्ट एक वर्षापूर्वीच तयार करुन दिले. ते देशातील विविध भागांमध्ये पाठवून चाचण्या घेतल्या.

त्या यशस्वी झाल्याने प्रेस कामगारांच्या व नेतृत्वाच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. क्रेडीट कार्डासारखे सुरक्षित इ पासपोर्ट लवकरच तयार केले जाणार आहेत. त्यात मोबाइलच्या सीमकार्डसारखे सीम असेल. ते इन ले मध्ये बसवले जाईल. असे 75 लाख इन ले या प्रेसमध्ये नुकतेच आले दोन महिन्यात ई पासपोर्ट छपाई सुरु होईल.

मार्च अखेरीपर्यंत 75 लाख ई पासपोर्ट छापून दिले जातील. त्यानंतर दरवर्षी एक ते दीड कोटीच्यावर ई पासपोर्ट तयार करून दिले जातील. हे काम वीस वर्षे कामगारांना पुरेल. इ पासपोर्टमध्ये डेटा चोरी, बदल, डेटा नष्ट करणे शक्य नाही. ई पासपोर्टसाठी नवीन आधुनिक मशीन, प्रिटिंगसाठी एमआयसीआर, नॉन ज्युडिशयल स्टॅम्पसाठी मायको परपरेशन या तीन नवीन मशीन लवकरच येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com