पोलिसाच्या 'त्या' हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू

पोलिसाच्या 'त्या' हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

मनमाड (Manmad) येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरज उगलमुगले (Suraj Ugalmugale) यांनी सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) आपल्या सासुरवाडीला येत आपल्या पत्नीसह सासू-सासऱ्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी घडली होती....

या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस सेवक सुरज उगलमुगले याचा दोडी बुद्रुक येथील निवृत्ती दामोदर सांगळे व शिला निवृत्ती शिंदे यांची मुलगी पूजा हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना सात महिन्यांचा मुलगा असून दोघे पती-पत्नी उपनगर नाशिक येथे वास्तव्यास आहेत.

गेल्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) सणासाठी बाळासमवेत पूजा दोडी येथे माहेरी आली होती. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुरज एका साथीदाराला सोबत घेऊन कारमधून शेळके वस्तीवरील सांगळे यांच्या घरी आला. तेथे पूजाला तुला काल नाशिकला यायला सांगितले होते का आली नाहीस असे विचारत भांडण उकरून काढले व हातातील चाकूने तिच्यावर वार करू लागला.

यावेळी पूजाला व तिच्या बाळाला वाचवण्यासाठी शीला सांगळे भांडणात पडल्या तर सुरजने त्यांच्याही मानेवर व हातावर चाकूने वार केले. निवृत्ती सांगळे यांच्यावरही चाकूने वार करत उगलमुगले व त्याच्यासोबत साथीदार तेथून पसार झाले.

वस्तीवरील आजूबाजूच्या लोकांनी जखमी अवस्थेतील तिघांनाही दोडी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, अतिरक्तस्राव होत असल्याने तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सासरे निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला असून, शिला सांगळे व पूजा उगलमुगले यांची तब्बेत गंभीर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com