ग्रामविकास मंत्र्यांच्या घरासमोर जि. प. शिपाई करणार आंदोलन

ग्रामविकास मंत्र्यांच्या घरासमोर जि. प. शिपाई करणार आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पदोन्नतीसह (Promotion) इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे (zilha parishad) शिपाई (Peon) ग्रामविकास मंत्र्यांच्या (Minister for Rural Development) घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन (agitation) करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातून (nashik district) या आंदोलनात 400 पुरूष व महिला शिपाई सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद (Maharashtra State Zilha Parishad) पदवीधर कर्मचारी संघटनेचे (Graduate Employees Union) नाशिक जिल्हाध्यक्ष मंगेश दराडे (Nashik District President Mangesh Darade) यांनी दिली.

पदोन्नतीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर व परिचर कर्मचारी संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आंदोलनाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दि. 20 व 21 जून रोजी काळी फित लावून काम करीत शासनाचा निषेध नोंदविणे. दि. 22 जून रोजी दुपारी भोजनकाळात सर्व जिल्हास्तरावरील मुख्यालयासमोर निदर्शने करणे, या कालावधीत जर काहीच तोडगा निघाला नाही तर दि. 28 जूनपासून कागल (जि.कोल्हापुर) येथील राज्याचे ग्रामविकास मंत्री (Minister for Rural Development) यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन (agitation).

या आंदोलनात महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी सेवकांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाच्या (state government) ग्रामविकास विभागाचे व ग्रामविकास मंत्री महोदयांचे लक्ष वेधणे ही भूमिका आहे. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना (Maharashtra State Zilla Parishad Parichar Karmachari Sanghatana), राज्य सरकारी गट-ड (चतूर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, मुंबई, तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना (रजि.नं. 5598), महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना (रजि.नं. 3950) या चारही संघटना मागील दोन वर्षांपासून निवेदनांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहेत.

राज्य शासनाला तीन दिवसीय आंदोलनाची सुचना दिलेली आहे, जर या तीन दिवसांच्या आंदोलनाच्या (agitation) पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने दखल घेऊन बैठकीसाठी वेळ व दिनांक दिला नाही. तर महाराष्ट्रातील 35 जिल्हा परिषेदेचे जवळपास 10 हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी हे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (जि.कोल्हापूर) येथील निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत, यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील महिला आघाडीचा सहभाग मोठा असणार आहे, 10,000 कर्मचार्‍यापैकी जवळपास 5000 ते 6000 महिला या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश दराडे यांनी दिली.

या आहेत मागण्या

परिचर (वर्ग-4) पदांवरून कनिष्ठ सहाय्यक वर्ग-3 पदांवर पदोन्नतीचे प्रमाण 40:50:10(पदोन्नतीने 40 टक्के : सरळसेवा 50 टक्के व वाहन चालकांमधून लिपीक - टंकलेखक 10 टक्के) प्रमाणे होण्यासाठी ग्रामविकास विभागाचे सुधारीत सेवाप्रवेश नियम / अधिसूचना निर्गमित करावेत. पदे निरसित करण्याबाबत ग्रामविकास विभागाने दि. 5 मे 2016 रोजी निर्गमित केलेला शासननिर्णय तत्काळ रद्द करून, यान्वये निरसित केलेली 25 टक्के पदे पुन्हा पुनर्जिवित करावीत व परिचर (वर्ग-4) ची सर्व रिक्त पदे ही सरळ सेवेने तात्काळ भरावीत.,

3) ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आरोग्य सेवक, ग्रामसेवक, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक/लेखा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदी पदांवर समायोजन करण्यात येते, त्याच धर्तीवर जिल्हा परिषद परिचर (वर्ग-4) कर्मचा-यांचे देखील या पदांवर शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती पदोन्नती / समायोजन करण्यात यावे., 4) चुकीच्या वेतन निश्चीतीमुळे अतिप्रदान झालेल्या रक्कमेची वसुली तात्काळ थांबविण्यात यावी. , 5) परिचर (वर्ग-4) कर्मचार्‍यांच्या धुलाई भत्त्यात वाढ करून तो 1,000/- रूपये एवढा करण्यात यावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com