रस्त्यांच्या वाद प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आवश्यक

 राधाकृष्ण गमे
राधाकृष्ण गमे

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

नाशिक (Nashik) विभागातील शेतकर्‍यांच्या (farmers) शेतरस्ता व वाहिवाटीच्या रस्त्यांच्या दाव्यामध्ये आता यापुढे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करताना स्थळ दर्शक छायाचित्रे (photographs) आणि जिओ टॅगिंग (Geo-tagging) बंधनकारक करण्यात येत असल्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनीविभागातील सर्व संबधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक शेत रस्ते व वहिवाट रस्त्यांसंबंधी अनेक दावे तहसील कार्यालयात (tehsil offices) दाखल होतात. यामध्ये निर्णय घेताना प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून तहसीलदार (tehsildar) आणि इतर महसूल अधिकारी (revenue officer) यांनी स्थळ पाहणी करणे बंधनकारक आहे. यापुढे शेत रस्त्यांच्या वाद प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करतेवेळी उपस्थित तहसीलदार व इतर महसूल अधिकारी यांचे वादी व प्रतिवादी जर ते उपस्थित असतील,

तर त्यांच्या समवेत छायाचित्रे, प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती, दिशा, चतु:सीमा तसेच सदर जागेचे स्थळ निरीक्षण करतेवेळी तारीख व वेळ दर्शविणारा रियल टाईम फोटो आणि अक्षांश व रेखांश फोटोमध्ये दर्शविणे यासह जिओ टॅगिंगचा वापर आता बंधनकारक करण्यात येत आहेत. असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील सर्व अधिकार्‍यांना नुकतेच दिले आहेत.

शेतकर्‍यांचे शेतजमीन व वहिवाट विषयक रस्त्यांचे दावे आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करून गुणवत्तेवर निकाली काढण्यास यामुळे मदत होणार आहे. रस्त्यांच्या वाद - विवाद प्रकरणी अशा प्रकारे प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून काढलेले फोटो हे रस्त्यांच्या दाव्यासंबंधी प्रकरणाचा कायदेशीर भाग असेल आणि प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी व वाद-विवाद प्रकरणी न्याय निर्णय पारित करताना याचा साकल्याने विचार करणे आवश्यक राहील.

शेतकर्‍यांच्या शेत रस्ता तसेच वहिवाट रस्त्यांची अनेक प्रकरणे नियमित तहसील कार्यालयात दाखल होतात. त्यामुळे अनेक वेळा वाद - विवाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही (Law and order) प्रश्न निर्माण होतो. रस्त्यांच्या प्रकरणी कार्यवाही करताना पक्षकार, पंच यांची संपूर्ण नावे, पत्ते, स्वाक्षरी, रस्त्याबाबतचा अडथळा यासह स्थळ निरीक्षण करणार्‍या अधिकार्‍यांचे संपूर्ण नाव व पदनाम आणि स्वाक्षरी असणे आवश्यक राहील.

जिओ टॅगिंग आणि सर्वंकष कायदेशीर प्रणालीचा वापर करुन शेतजमीन व वहिवाट रस्त्यांच्या प्रकरणी शेतकर्‍यांचे दावे प्रभावीपणे निकाली काढण्यास यामुळे मदत होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com