वर्षभरात छ. शिवाजी मंडईत भाजी ओटे व डोम
वर्षभरात छ. शिवाजी मंडईत भाजी ओटे व डोम
नाशिक

वर्षभरात छ. शिवाजी मंडईत भाजी ओटे व डोम

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

येथील छत्रपती शिवाजी मंडई च मध्यभागी असलेल्या भाजी बाजारावर नवीन डोम उभारण्याची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होणार असून यामुळे रस्त्यावरील भाजी बाजार बंद होण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासन व्यक्त केला आहे.

छ. शिवाजी मंडईमध्ये सुरुवातीला 80 ओटे उघडण्यात आले होते. याठिकाणी व्यवसायिकांची गर्दी कमी असल्याने खाली बसूनच व्यवसाय करू लागले कालांतराने व्यवसायिकांची गर्दी वाढल्यानंतर जागा अपुरी पडत असल्याने कोठे तोडून त्या ठिकाणी व्यवसायिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

मात्र रस्त्यावर फळ विक्रेते व भाजीविक्रेत्यांची मोठी गर्दी होऊ लागल्याने बाहेर असलेल्या व आत बसलेल्या सर्व व्यवसायिकांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली त्या अनुषंगाने आता गाळे उभारणीचे नियोजन करण्यात आले असून एक एप्रिल 2021 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले आहे.

नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे, नगरसेविका सिमा निगळ व दीक्षा लोंढे स्वीकृत नगरसेवक विजय भंदुरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न निकाली निघाला आहे दोन कोटी 87 लाख रुपये खर्चाच्या निविदाही पूर्ण झाले असून इनोव्हेटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे काम घेतलेले आहे.

आठ फूट बाय सहा फूट मापाचे 190 ओटे याठिकाणी उभारले जाणार असून दोन मजली गाळ्यांच्या उंचीप्रमाणे डोम उभारला जाणार आहेया गाण्याच्या उभारणीमुळे सध्या बकाल झालेल्या बाजारपेठेला खऱ्या अर्थाने चांगला दर्जा प्राप्त होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com