जिल्ह्यात दोन दिवसात १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दोन दिवसात १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील ४८ तासात ७६ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दोन दिवसात १२१ ( ५५+५६ ) जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील ४८ तासात ७६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील ४८ तासात १२१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ५९ ( २७+३२) इतकी आहे. ग्रामिण भागात ५३ ( १९+३४) रुग्ण तर जिल्हाबाह्य ०९ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ४८ तासात ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात मालेगाव मनपा विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ६८३ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com