नाशिकच्या निओ मेट्रो व हायस्पीड रेल्वेबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

नाशिकच्या निओ मेट्रो व हायस्पीड रेल्वेबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या वैभवात भर घालणार्‍या  निओ मेट्रो (Neo Metrol) या आदर्श प्रकल्पाच्या माद्यमातून देशभरातील पहिल्या पायलट प्रकल्पाची उभारणी, दोन वर्षांपासन प्रलंबित नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेची (Nashik-Pune High Speed Railway) घोषणा सत्यतेत उतरण्यासाठी नाशिककर उत्सूक दिसून येत असले तरी केवळ प्रधानमंत्री यांच्या कार्यालयातून या प्रकल्पांना हिरवा कंदिल मिळणे प्रलंबित होते...

या संदर्भात बुधवारीपून्हा वरिष्ठ पातळीवरुन चर्चा सूरू झाल्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे. राज्य शासन व केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली असताना केवळ पंतप्रधानांच्या स्वाक्षरीसाठी विलंब होत होता.

पंतप्रधान कार्यालयाद्वारे वरिष्ट अधिकार्‍यांनी  बुधवारी (दि.15) निओ मेट्रो व नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या उभारणी बाबतची सविस्तर माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, महारेलचे वरिष्ठ अधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ. दिक्षीत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झालेले होते.

नाशिकच्या निओ मेट्रो व हायस्पीड रेल्वेबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर
Video : दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; द्राक्षबागांना फटका

प्रधानमंत्री कार्यालयाने हायस्पीड रेलचा तांत्रिक माहितीच्या अहवाल महारेलला सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळून नाशिकच्या वैभवातील या दोन प्रकल्पांची उभारणी गतिमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशाचा पायलट प्रकल्प म्हणून केंद्र सरकारने नाशिकला टायर बेस्ड निओ मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले. सुमारे 2100 कोटी रुपये गुंतवणूकीतून हा प्रकल्प साकारणार होता. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात निधी दिला आहे.  

नाशिकच्या निओ मेट्रो व हायस्पीड रेल्वेबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर
विचित्र अपघात! ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह नंतर फुटले टायर; ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू


नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे उभारणीसाठी महारेलच्या माध्यमातून गती देण्यात आली होती. विविध ठिकाणाच्या जागा अधिग्रहण करण्याचे कामही सुरू झाले होते. मध्यंतरी त्याला अचानक ब्रेक लागला होता. 16 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 9 हजार कोटी रुपयांची समभागाच्या माद्यमातून प्रकल्प पूर्ण होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिकच्या निओ मेट्रो व हायस्पीड रेल्वेबाबत महत्वाची बातमी; वाचा सविस्तर
अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न कसा झाला? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर


निओ मेट्रो व महारेल या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मेट्रो महारेल हब तयार केला जाणार असून, सुमारे 18 ते 20 मजल्यांच्या या इमारतीमध्ये शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, मेट्रो तसेच पुणे रेल्वेचे स्थानक व इतर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com