
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
भारतीय योग संस्कृती (Indian Yoga Culture) जगाला दिशा दर्शक आहे. प्राचीन काळापासून ऋषी-मुनी (Sage) व महंतांनी योग साधनेचा प्रचार व प्रसार (Promoting and disseminating yoga tools) केला.
सुदृढ शरीर (Strong body) व मनाच्या शांतीसाठी योग (yoga) आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिन्नर न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश आर. आर. कुलकर्णी (Sinnar Court Assistant Judge R. R. Kulkarni) यांनी केले.
येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये (S. G. Public school) योग दिनानिमित्त (yoga day) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, संचालक विजय गडाख, व्यवस्थापक अभिषेक गडाख, वकिल संघाचे अध्यक्ष जयसिंग सांगळे, अॅड. रमेश काळे, अॅड. अण्णासाहेब सोनवणे, योगेश गडाख, प्रा. राजाराम मुंगसे, मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे, पर्यवेक्षक माधवराव शिंदे, इंग्रजी विभाग प्रमुख अनिता कांडेकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी (students) अर्धचक्रासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, भद्रासन, वज्रासन, मकरासन, भुजंगासन, शलभासन यासारखे विविध योगासने व प्राणायाम केले. प्रविण सोमवंशी यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विलास सातपुते, बळीराम आरखडे, शिवाजी गाडेकर, शुभांगी मोगल, चंद्रकला साळुंखे, अतुल पाटणे, गणेश तिडके, पुष्पा जाधव उपस्थित होते.