नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रमाची अंमलबजावणी

नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रमाची अंमलबजावणी

निफाड । प्रतिनिधी | Niphad

शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावे यासाठी निफाडच्या नगराध्यक्षा रुपाली विक्रम रंधवे (Rupali Vikram Randhave, City President of Niphad) यांनी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम घेवून त्याची यशस्वी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निफाड (niphad) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) 17 प्रभागात फिरून नागरिकांना येणार्‍या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले जातील. तसेच जे प्रश्न जागेवरच सोडविणे शक्य आहे ते तत्काळ मार्गी लावून नागरिकांना समस्यामुक्त करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा रुपाली रंधवे यांनी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ (City president at your door) या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत नगराध्यक्षा रुपाली रंधवे या दररोज एका प्रभागात फिरून त्या प्रभागातील महिला, नागरिक यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा (Water supply), विजेचे प्रश्न (Electricity problems), रस्ते (road) आदींची माहिती घेत असून जे प्रश्न जागेवरच मार्गी लागणे शक्य आहे अशा समस्यांचा जागेवरच निपटारा केला जात आहे. आत्तापर्यंत नगराध्यक्षा रुपाली रंधवे यांनी बरड वस्ती,

अहिल्या देवी होळकर नगर, गायत्री नगर, रामनगर, शंकर नगर, दुबई मळा आदी भागांना भेट देवून नागरिकांच्या समस्या (Citizens' problems) जाणून घेतल्या. तसेच गाजरे वस्ती, संपत कापसे वस्ती आदी ठिकाणी जावून रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत शिवसेना कार्यकर्ते (Shiv Sena activists) व परिसरातील महिला उपस्थित राहत असून त्यांच्या समस्यांची जागेवरच सोडवणूक होत असल्याने त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

स्वच्छ , सुंदर शहराचा संकल्प निफाड शहरातील रस्ते, चौक सुशोभित करण्याबरोबरच अत्याधुनिक खेळाची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, लहान मुलांसाठी उद्याने तसेच शहरात लाईटची व्यवस्था आणि पर्यावरणाला महत्व देवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा मानस आहे. तसेच ओला व सुका कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावली जात असून शहरातील विज, रस्ते, पाणी आदी मुलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत असून स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा संकल्प आहे.

- रुपाली रंधवे, नगराध्यक्षा (निफाड)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com