महाविद्यालयांत आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा
नाशिक

महाविद्यालयांत आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा

विद्यापीठाच्या सूचना

Bharat Pagare

नाशिक | Nashik

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविताना आरक्षण धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिल्या आहेत. याबाबतचे परीपत्रक विद्यापीठाने काढले अाहे.

मराठा समाजासह सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास (एसईबीसी) जागा आरक्षित ठेवण्याबाबत शासनाने ९ जुलै २०१९ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यात 'एसईबीसी' वर्गास १२ टक्‍के जागा आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्‍के जागा आरक्षित ठेवणे राज्यातील सर्व विद्यापीठातील शिक्षण संस्थांना आवश्‍यक आहे. या आरक्षणाच्या तरतुदीनुसार कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.

राज्य शासनाने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णय शैक्षणिक संस्थांतील प्रवेशामधील राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाखेरिज सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, विधी विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, त्यांच्या संलग्नित असणारी सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांना राबविणे बंधनकारक आहे.

याचाच आधार घेत शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाच्या उपकुलसचिवांनी सर्व महाविद्यालयांना सूचित केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com