‘योजनांची अंमलबजावणी करा’

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवाराची आढावा बैठक
‘योजनांची अंमलबजावणी करा’

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

‘विविध योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा (Technology) अधिकाधिक वापर करावा’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले.

दिंडोरी तालुका (dindori taluka) आढावा बैठक (Review meeting) घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ह्या बैठकीप्रसंगी विविध विभागांचा आढावा घेत सामान्य नागरिकांसाठी केंद्राच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. दिंडोरी नगरपालिकेच्या आदिवासी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजना (Prime Minister's Housing Scheme), शेतकरी सन्मान योजना (Farmers Honor Scheme), विविध पाणीपुरवठा योजना (Water supply scheme), जलजीवन मिशन योजना,

आरोग्य विषयक योजना, हर घर दस्तक या अभियानांतर्गत घरोघरी लसीकरण (vaccination), पशुवैद्यकीय सुविधा (Veterinary facility) आदी शासकीय योजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या (Citizens' problems) जाणून घेत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नामदार डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की विविध योजनांची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा लोकांच्या समस्या जाणून घ्या विशेषता कोविड लसीकरणाचा आढावा रोजच्या रोज घेतला जावा.

केंद्राच्या विविध योजनांचा अभ्यास करून आपल्या विभागांमध्ये राबविल्या जाव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करा. योजना राबविताना काही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा असेही प्रतिपादन या प्रसंगी डॉ. भारती पवार (dr. bharti pawar) यांनी केले. प्रत्येक कार्यालयात तक्रार पेटी लावण्यात यावी, या तक्रारीचा दर महिन्याला आढावा घेऊन आणि आवश्यक तेथे राज्यसरकार बरोबर समन्वय साधू असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी दिंडोरीचे प्रांत संदीप अहिरे, दिंडोरी तहसीलदार पंकज पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवलेकर, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, प्रमोद देशमुख, शाम मुरकुटे, चंद्रकांत राजे, अमर राजे, शाम बोडके, मनिषा बोडके, योगेश बर्डे, विलास देशमुख,संजय कावळे,

बाबूभाई मणियार, फारूक बाबा, सोमनाथ सोनवणे, सागर गायकवाड, अनिल गाढे, वसंत जाधव, शिवाजीबाबा पिंगळ, विनायक शिंदे, दिलीप बोरस्ते, गणेश शिंदे, योगेश बर्डे, नितीन शार्दूल, अमोल मुरकुटे, भगीरथ तिडके, कुंदन जावरे, अक्षय वैद्य, डॉ. स्वप्नील शिंदे, सज्जन गावित आदिंसह विविध विभागाचे अधिकारी, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, नागरिक, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com