सैनिकांसाठी अमृत जवान अभियानाची राज्यभर अंमलबजावणी करा : ना. भुसे

सैनिकांसाठी अमृत जवान अभियानाची राज्यभर अंमलबजावणी करा : ना. भुसे
कृषीमंत्री दादा भुसे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये शहीद जवान (Martyr soldier), माजी सैनिक (Ex-serviceman), शहिदांच्या विधवा (Widows of martyrs) व कर्तव्यावर कार्यरत सैनिकांच्या कुटुंबियांची अनेक कामे असतात. त्यांच्या शासन दरबारी प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी देशाच्या 75 व्या स्वातंत्रदिन महोत्सवानिमित्त संपुर्ण राज्यात दि. 1 मे 2022 ते 15 जून 2022 या कालावधीत अमृत जवान अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे (Former Soldier Welfare Minister Dadaji Bhuse) यांनी दिली.

महसूल, भूसंपादन, पुनर्वसन, विविध प्रकारचे दाखले, पोलीस विभागाकडील तक्रारी, ग्रामविकास विभागाच्या विविध योजना, कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभाचे प्रस्ताव, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाचे परवाने आदी कामांसाठी विशेष मेळावे घेवून शहीद जवान, माजी सैनिक व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न प्राधान्यांने मार्गी लावण्यासाठी अभियान राबविण्याचे असे आदेश ना. भुसे यांनी दिले होते. त्यानुसार सदर उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीय समिती (Taluka and district level committee) स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी (Collector) असतील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक (Superintendent of Police), मनपा आयुक्त (Municipal Commissioner), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (District Superintendent Agriculture Officer), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपवनसंरक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सा. बां. अधीक्षक अभियंता, जलसंपदा अधीक्षक अभियंता, महावितरण अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी, संरक्षण विभागातील एक प्रतिनिधी अशा सदस्यांची समिती असेल. निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील.

त्याचप्रमाणे तालुकास्तरावर उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी, पं.स. गटविकास अधिकारी, सहा. निबंधक सहकारी संस्था, तालुका कृषि अधिकारी, नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे एक प्रतिनिधी, विशेष निमंत्रित हे या समितीचे सदस्य असतील. तहसीलदार हे समितीचे सदस्य सचिव असतील. दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी लोकशाहीदिनाच्या धर्तीवर अमृत जवान सन्मानदिन आयोजित करण्यात यावा.

हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्ष जिल्हा व तालुकास्तरावर स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात (Tehsil Office) एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहायता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचार्‍याची नेमणूक होणार असून दुपारी 12 ते 3 या कालावधीत विभागांकडील विविध तक्रार अर्ज स्वीकारण्यात येतील व संबंधितांना प्राप्त झालेल्या अर्जाची पोहोच तात्काळ देवून अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग होणार आहे. प्रलंबित तक्रारी निवारण्यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक कालमर्यादा असेल व त्याचे सनियंत्रण जिल्हाधिकारी करतील, असेही ना. भुसे यांनी नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.