शेतकरीहिताचे उपक्रम राबवा : कृषीमंत्री भुसे

शेतकरीहिताचे उपक्रम राबवा : कृषीमंत्री भुसे

बाजार समितीत गोदाम, चाळणी यंत्राचे लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बाजार समितीने Malegaon APMC आवारात एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास दोन मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य चाळणी यंत्राची grain sieve machine उभारणी करत तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शेतकरी हिताचे हे उपक्रम समितीला राज्यात नावलौकिक मिळवून देणारे ठरतील, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी व्यक्त केला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनासह गोदाम व चाळणी यंत्राचा लोकार्पण सोहळा कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आ. सुहास कांदे, माजी जि. प. अध्यक्ष मधुकर हिरे, उपमहापौर नीलेश आहेर, सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, प्रसाद हिरे, प्रमोद शुक्ला, संजय दुसाणे, राजाराम जाधव, विनोद वाघ, वसंत कोर, सचिव अशोक देसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बाजार समितीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही देत भुसे म्हणाले, समितीमधील प्रमुख रस्त्यांच्या काँकिटीकरणासह पावसाळ्यात पडणार्‍या पावसामुळे पाणी आणि चिखलाचा निचरा होण्यासाठी कामे तत्काळ करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तालुक्याच्या इतरही भागांमध्ये बाजार समितीची व्याप्ती वाढवून शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत निधीचे वाटप करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले असून तालुक्यासाठी जवळपास 43 कोटींचे अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग केले आहे. पैकी 36 कोटींचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असून अद्याप 7 कोटींचे अनुदान हे शेतकरी बांधवांचे बँक खाते उपलब्ध नसल्यामुळे पडून आहे. अशा वंचित शेतकर्‍यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्याचे निर्देशही भुसे यांनी यावेळी दिले.

तालुक्यातील इतर भागातील बाजार समित्यांना उपबाजार समितीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करत आ. सुहास कांदे यांनी मालेगाव बाजार समितीमार्फत शेतकर्‍यांना ज्या सेवा आणि सुविधा दिल्या जात आहेत त्या नक्कीच कौतुकास पात्र असून भविष्यात उपबाजार समित्या तयार केल्यास शेतकर्‍यांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रास्ताविक सभापती राजेंद्र जाधव यांनी करत समितीतर्फे शेतकरी हितासाठी राबवल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. मार्केटमध्ये मका आणताना तो वाळवून आणल्यास शेतकर्‍यांना भाव मिळू शकतो. बळीराजाला अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध असल्याची ग्वाही सभापती जाधव यांनी दिली.

यावेळी प्रसाद हिरे व वारकरी संप्रदयाचे श्रावण महाराज यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार संजय दुसाणे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com