ढोल ताशांच्या गजरात श्रीगणेशाचे विसर्जन

ढोल ताशांच्या गजरात श्रीगणेशाचे विसर्जन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वतंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षनिमित्त यंदा ब्रह्मा व्हॅली ( Brahma Valley )संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध लोक कलेचे दर्शन घडविणारा गणेशउत्सव ( Ganesh Festival ) साजरा केला.

गेली दहा दिवस ब्रह्मा व्हॅली गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध लोककला, विविध प्रकारची नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे तसेच ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे गायन व नृत्य असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

ब्रह्मा व्हॅली गणेशोत्सव मंडळ-2022 या मंडळाचे नाशिक शहरात हे प्रथम वर्ष होते व याप्रमाणे दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती लोकांमध्ये जनजागृती व्हावी व लोक संघटित राहावे हा उद्देश त्यांचा होता. या स्वतंत्र काळात लोकशाहीतही लोकजागृती गरज आहे हाच विचार समोर ठेवून यापुढे ब्रह्मा व्हॅली गणेशोत्सव मंडळ कार्य करणार आहे असे यावेळी पानगव्हाणे यांनी सांगितले.

दि. 09/10/2022 रोजी ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे (पाटील) यांनी श्री सत्य नारायण / सत्य विनायकाच्या पूजेचे वाचन केले त्यानंतर भव्य मिरवणूक काढून महाराष्ट्राचे आवडते वाद्य संबळ तसेच ढोल व लेझीम पथक या वाद्यांच्या गजरात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमाचे आयोजक व ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, डॉ. सी. के. पाटील, डॉ. हरी कुदळ, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, प्रा. विनायक निखाडे, डॉ. विजय वाघ, प्रा.चंद्रकांत शिरसाट, विजय तांबे, डी एच आहेर, सचिन पाटील, प्रमोद शिनगान, संदीप लांडगे, रामभाऊ गायकवाड, दीपक बेंडकुळे आदींसह ब्रह्मा व्हॅलीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com