महसूल विभागात तात्काळ अनुकंपा पद भरती करा

महसूल विभागात तात्काळ अनुकंपा पद भरती करा

नाशिक । प्रतिनिधी

महसूल विभागात अनुकंपा तत्वावर पद भरतीचा मुद्दा करोना संकटामुळे दुर्लक्षित झाला आहे.

मागील पाच ते वर्षो पासुन आम्ही अनुकंपा धारक नोकरीच्या प्रतिक्षेत आहोत. याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यास दिरंगाई केली जात आहे. तरी या प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणीचे पत्र तेजस शेरसाटे या उमेदवाराने पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यात महसूल विभागाचा विचार केला तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील लाखो पदे रिक्त आहेत. तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण अनुकंपा धारकांचा विचार केला तर रिक्त जागेची संख्या दहा ते पंधरा हजार ऐवढी आहे.सत्र न्यायलय,शासकीय रूग्णालय, बांधकाम कार्यालय असे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयात अनुकंप उमेदवाराचा तात्काळ विचार केला जातो.असे असताना महसूल विभागात मयात कर्मचाऱ्यांच्या वारसाना अनुकंपात नोकरीत घेण्यासाठी तबला १० ते १५ वर्षे लागत प्रतीक्षा करावी लागत आहे.

त्यातच दरवर्षी शेकडोच्या संख्येत अनुकंपा धारक वयोमर्यादेतुन बाद होत आहेत व काहीनी आत्महत्याचा मार्ग स्वीकारत आहेत. आम्हाला आई वडीला नंतर कुणाचाच अासरा नाही. कुटुंबाची सर्वस्व जिम्मेदारी आमच्या खांद्यावर आहे. त्यात करोना सारख्या भयंकर महामारीत रोजगाराचा आभावामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावे, अशी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

महसूल विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहे. शासनाने या जागा भरताना अनुकंपाधारक उमेदवारांना प्राधान्य द्यावे. निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अनेक उमेदवार वयोबाद होत आहे. शासनाने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती.

- तेजस शेरताटे,अनुकंप उमेदवार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com