नासाकाची चाके फिरण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी - आ. सरोज आहिरे

नासाकाची चाके फिरण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी - आ. सरोज आहिरे

दे.कॅम्प। वार्ताहर Devlali Camp

तब्बल चार तालुक्यांच्या शेतकर्‍यांच्या विकासाचा केंद्रबिंदु असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना Nashik Cooperative Sugar Factory गेल्या आठ वर्षांपासुन बंद आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची कोंडी झालेली आहे.

कारखाना भाडेतत्त्वावर सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तातडीने पुढील कार्यवाही करावी यासाठी देवळालीच्या आ. सरोज आहिरे MLA Saroj Ahire यांनी राज्याचे सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील State Co-operation Minister Balasaheb Patilयांना निवेदन देऊन विनंती केली आहे.

आठ वर्षा पासून बंद असकलेला नासाका चालू करण्यासाठी जिल्हा बँकेला भाडे तत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्याचे सहकार मंत्र्यांनी आदेशित केले होते. त्या निविदांची मुदत 8 सप्टेंबर रोजी संपून 9 रोजी निविदा उघडण्यात आलेल्या आहेत. ज्यांचे टेंडर जास्त व नियमानुसार आहे त्यांचेशी करारनामा करून कारखाना त्यांच्या ताब्यात देऊन तो सुरु करण्याची तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

यासाठी आ. आहिरे यांनी राज्याचे सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली असता याबाबद लवकरच कार्यवाही होईल असे आश्वासन देण्यात आले. तसेच गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कालावधी कमी असल्याने लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कारखान्याची आठ वर्षांनंतर चाके फिरणार असल्याने चारही तालुक्यांतील शेतकर्‍यांत समाधान व्यक्त होत आहे. ही संख्या मोठी आहे .तसेच कारखाना सुरू झाल्यास भाजीपाला पीक कमी होऊन या पिकांना देखील योग्य भाव मिळणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com