गृहविलगीकरण रुग्णांसाठी आयएमएची हेल्पलाईन

गृहविलगीकरण रुग्णांसाठी आयएमएची हेल्पलाईन
करोना

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये आहेत. करोनाबाधित रुग्णांना मोफत आरोग्य सल्ला देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिककडून कोविड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

सर्व फिजिशियन डॉक्टर्स मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोविड बाधित रुग्णांची सेवा करण्याचे काम अविरत करत आहेत. अशा वेळी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या र्टीरीरपींळपश मध्ये असलेल्या नातेवाईकांसाठी मदत, योग्य सल्ला आणि उपचार मिळवून देण्यासाठीचा हा उपक्रम असल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले आहे.

आयएमएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुपारी दोन तास (सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत) आणि सायंकाळी दोन तास (चार ते सहा वाजेपर्यंत) ऑडिओ अथवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून खालील तज्ज्ञ डॉक्टरांशी या हेल्पलाईन वरून संपर्क साधता येणार आहे.

या विषयांवर प्रश्न विचारू शकता

विलगीकरणात काय करावे/करू नये?

विलगीकरणातील औषधोपचार आणि आहार

विलगीकरणात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?

गर्भवती महिला आणि कोव्हिड

लसीकरण

धोक्याची लक्षणं आणि डॉक्टरांना त्वरित कधी भेटावे?

येथे साधा संपर्क

डॉ पूनम महाले : 9172829142,

डॉ सतीश पाटील : 9823055107

डॉ निलेश लुंकड : 9371572937

डॉ अमृता हिरवे : 8007880748

डॉ दिनेश पाटील : 9822683400

डॉ पंकज गुप्ता : 9834618133

डॉ जयराम कोठारी : 9922441852

डॉ आनंद पारीख : 9930339368

डॉ उमेश मराठे : 9822073464

डॉ राकेश सिंह : 9112291918

डॉ श्रिया अंकुर देसाई : 77200 79555

डॉ स्वप्नांजली आव्हाड : 80078 62659

डॉ पुष्पक हरीश पलोड : 7588426977

डॉ जयराम कोठारी : 9922441852

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com