गोदावरी स्‍वच्‍छतेसह विविध उपक्रमांचे आयोजन; विविध संस्‍था, संघटनांचा मिनी कुंभमध्ये आयएमएचाही सहभाग

गोदावरी स्‍वच्‍छतेसह विविध उपक्रमांचे आयोजन; विविध संस्‍था, संघटनांचा मिनी कुंभमध्ये आयएमएचाही सहभाग

नाशिक | प्रतिनिधी

स्‍वच्‍छतेचा जागर करतांना येत्‍या रविवार (दि.१ ऑक्‍टोबर) ते मंगळवार (दि.३ ऑक्‍टोबर) या कालावधीत नाशिक व परिसरात स्‍वच्‍छता उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये गोदावरी पात्र स्‍वच्‍छतेसोबत शहरात स्‍वच्‍छता, जनजागृती, ब्रह्मगिरी भागातील कुंड पुनर्जिवित करण्यासह विविध उपक्रमांचा समावेश असेल, अशी माहिती अभिनेते चिन्‍मय उदगिरकर, आयएमए अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, डॉ.आवेश पलोड आदींनी पत्रकार परीषदेत दिली.

नाशिक महानगरपालिका, नमामी गोदा फाउंडेशन, सत्‍संग फाउंडेशन यांच्‍यासह विविध संस्‍था, संघटनांतर्फे होत असलेल्‍या या मिनी कुंभमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचा सहभाग राहाणार आहे. पत्रकार परीषदेस डॉ.वृषीनीत सौदागर, नाशिकरोड आयएमएच्‍या अध्यक्षा डॉ.स्‍वप्‍नांजली आव्‍हाड, डॉ.पंकज भट, भालचंद्र ठाकरे, डॉ.स्‍वप्‍नील खैरनार व इतर उपस्‍थित होते.

गोदावरी स्‍वच्‍छतेसह विविध उपक्रमांचे आयोजन; विविध संस्‍था, संघटनांचा मिनी कुंभमध्ये आयएमएचाही सहभाग
देशदूत संवाद कट्टा : क्वालिटी सिटी - स्वच्छ नाशिक

अभिनेते चिन्‍मय उदगिरकर म्‍हणाले, तीन दिवसांच्‍या या उपक्रमांत १ ऑक्‍टोबरला स्‍वच्‍छता ही सेवा या अभिनव उपक्रमाअंतर्गत शहरभरात स्‍वच्‍छता मोहिम राबविली जाईल. २ ऑक्‍टोबरला सकाळी ७ वाजेपासून गोदावरी आईच्‍या स्‍वच्‍छतेची मोहिम सुरु होईल. आनंदवल्‍ली ते रामतीर्थ या भागामध्ये एकूण १० ठिकाणी मोहिम पार पडणार आहे.

यावेळी जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग, तसेच सत्‍संग फाउंडेशनचे श्री. एम. यांची प्रमुख उपस्‍थिती राहाणार आहे. उडाण, शौर्य, उमंग, राजमुद्रा ग्रुप यांसह राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत विद्यार्थी उपस्‍थित राहातील. तसेच ३ ऑक्‍टोबरला ब्रह्मगिरी परिसरात कुंड पुनर्जिवित करण्याच्‍या उद्देशाने उपक्रम राबविला जाणार आहे.

गोदावरी स्‍वच्‍छतेसह विविध उपक्रमांचे आयोजन; विविध संस्‍था, संघटनांचा मिनी कुंभमध्ये आयएमएचाही सहभाग
Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?

मनपा घनकचरा विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड म्‍हणाले, महापालिका प्रशासनाच्‍या वतीने स्‍वच्‍छता ही सेवा याअंतर्गत व्‍यापक मोहिम राबविली जाते आहे. नाशिककरांनी मोहिमेत सहभागी व्‍हावे. तसेच नित्‍याने ओला व सुका कचना विलगीकरण करतांना महापालिका प्रशासनाला सहकार्य करत शहर स्‍वच्‍छ ठेवण्यात हातभार लावावा. प्‍लॅस्‍टिक निर्बंधांबाबत प्रशासन कठोर भूमिकेत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

आयएमए अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ म्‍हणाले, सामाजिक आरोग्‍य चांगले राहाण्यासाठी आरोग्‍य नेहमीच परीश्रम घेत असतात. परिसर स्‍वच्‍छ राहिल्‍यास आजारपण घटतील. या जाणीवेतून आयएमए या अभिनव उपक्रमाशी जोडले गेले आहे.

मोहिमेदरम्‍यान संकल्‍प हॉस्‍पिटलमार्फत डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचारी उपस्‍थित राहाणार असून, शिबिरार्थींना आरोग्‍यसेवा पुरवतील. डॉ.स्‍वप्‍नांजली आव्‍हाड म्‍हणाल्‍या, डॉक्‍टर थेट मैदानात उतरून स्‍वच्‍छता करणार असल्‍याचे याचा सकारात्‍मक संदेश समाजात जाणार आहे. डॉ.वृषीनीत सौदागर म्‍हणाले, नाशिककरांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्‍हावे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com