आयएमए क्रीडा महोत्सवाला सुरुवात
नाशिक । प्रतिनिधी Nashik
आयएमए नाशिकतर्फे ( IMA Nashik )आयोजित आयएमए स्पोर्टस महोत्सवात विविध क्रीडा प्रकारामध्ये आपले कौशल्य आजमवणार आहेत. या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. जेहान सर्कल ते दुगाव दरम्यान सायक्लोथॉनच्या माध्यमातून स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला.
आयएमएच्या वतीने शनिवारी (दि.21) व रविवारी (दि.22) तसेच शनिवार (दि.28) व रविवार (दि.29) दरम्यान विविध क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांपैकी सायलोथॉन, बॉक्स किकेट, बॉक्स फुटबॉल, बॅटमिटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, कॅरम, अॅथलेटीक्स, स्वीमींग, लॉन टिनेस आदी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
दि.27 व 28 ला मैदानी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती आयएमए नाशिकच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील आणि सचिव डॉ. विशाल पवार यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचे मुख्य समन्वक डॉ. नितिन चिताळकर, डॉ. कपिल र पाळेकर आणि डॉ. चैत्राली चौधरी यांच्यासह विविध स्पर्धांचे समन्वयकांनी स्पर्धांची माहिती दिली.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपाध्यक्ष डॉ. किरण शिंदे व डॉ. गितांजली गोंदकर तसेच खजिनदार डॉ. माधवी मुठाळ, डब्लूडीडब्लूच्या चेअरमन डॉ. शलाका बागुल व डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. किरण राजोळे, डॉ. सोनवणी, डॉ. अनिता भामरे, डॉ. सागर भालेराव, डॉ. अब्दुल वापीवाला, डॉ. शाम पाटील, डॉ. संजय पिंचा, डॉ. विक्रांत वाघ, डॉ. प्रसाद निकम, डॉ. अमोल राजदेव, डॉ. सुहास कोटक, डॉ. अनू वाघचौरे, डॉ. सुलभा पवार, डॉ. मयुरेश कुलकर्णी, डॉ. रिना राठी, डॉ. लखोजी चौधरी, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. प्रकल्प पाटील, डॉ. सपना नेरे, डॉ. पंकज भट, डॉ. सुदर्शन आहिरे डॉ. ललित डेरले डॉ. कपिल पाळेकर आदी उपस्थित होते. सकाळी 7 वाजता जेहान सर्कल येथून सायक्लॉथॉन स्पर्धेत 50 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील 50 किमीसाठीचे विजेते
पुरुष गट: डॉ. राहुल सोनवणी, द्वितीय: डॉ. सुशील पाटील, तृतीय:डॉ. कुणाल निकम,
महिला गट- प्रथम:डॉ. श्रिया कुलकर्णी, द्वितीय: डॉ. गीतांजली गोंदकर, तृतीय: डॉ. स्मिता दहेकर,
25किमी सायक्लॉथॉन प्रकारात
पुरुष गट: डॉ. प्रशांत देवरे, द्वितीय डॉ. देवेंद्र चौधरी, तृतीय डॉ. सचिन कोरडे,
महिला गट- प्रथम डॉ. स्वाती करकरे, द्वितीय: डॉ. प्रितिका चौधरी, तृतीय: डॉ. शिवानी कोरडे
यांना विजेते घोषित करण्यात आले.