डॉक्टरांवरील हल्याच्या निषेधाथ आयएमएचे शुक्रवारी आंदोलन

राष्ट्रीय स्तरावर कायदा करण्याची मागणी
डॉक्टरांवरील हल्याच्या निषेधाथ आयएमएचे शुक्रवारी आंदोलन

नाशिक । Nashik

डॉक्टरांवर हल्ले करणार्‍या विरोधात राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा करावा, या मागणीकरिता आणि होणार्‍या या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसियशनच्या वतीने शुक्रवारी (दि.18) काळ्या फिती बांधून आणि काळे मास्क लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनासीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. कविता गाडेकर, डॉ. विशाल पवार, डॉ. विशाल गुंजाळ्, डॉ. अनिता भांमरे, राजेद्र कुलकर्णी उपस्थत होते.

डॉ. सोनासीस यावेळी म्हणाले, डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिक्षा झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. कागदोपत्री कायदे असल्याने डॉक्टरांवर हल्ले करुनही कोणतीही शिक्षा होत नसल्याने अशा समाजविघातक वृत्तीचा आत्मविश्वास वाढ्तोे.

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते कायम ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर हल्ला करणार्‍यावर वेळीच शिक्षा झाली पाहिजे, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कठोर कायद्यासाठी भारतभर आयएमएकडून आंदोलन केले जाणार आहे. नाशिक जिल्हयातून पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना निवेदने पाठविली जाणार आहे, तसेच पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींना निवेदन दिली जाणार आहे.

कोविड काळात डॉक्टर त्यांचे घरदार सोडून काम करीत आहे, असे असतानाही दोन आठवड्यांमध्ये आसाम, पश्चम बंगाल, कर्नाट्क , मध्यप्रदेश या ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. महाराष्ट्रात दीड वर्षात पंधरा हल्याच्या घट्ना घड्ल्या आहेत. शुक्रवारी केल्या जाणार्‍या विधायक आंदोलानतून विविध मागण्या केल्या जाणार आहेत.

त्यामध्ये डॉक्टरांवर हिंसाचार रोखण्यासाठीचा केद्रीय कायदा पारीत करण्यात यावा, सदर कायद्याचा मसूदा संसदेमध्ये तयार असून गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपोमूळे कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो तात्काळ पारीत करावा जेणेकरुन हिंसाचार हा भारतीय द्ंड संहितेच्या कक्षेत येइल.

सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात, रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे, तसेच हल्ले करणार्‍यांवर जलद न्यायालयात खट्ले सुरु करण्याची मागणी करण्यात अशी मागणी केली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com