डॉक्टरवरील हल्ल्याचा 'आयएमए'कडून तीव्र निषेध

अलिबागमध्ये डॉ. स्वप्निल थळे यांच्यावर प्राणघातक हल्ला
डॉक्टरवरील हल्ल्याचा 'आयएमए'कडून तीव्र निषेध

नाशिक | Nashik

अलिबाग (Alibag) येथील डॉ. स्वप्नील थळे (Dr. Swapnil Thale) या डॉक्टरांवरील हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए, महाराष्ट्र) ने तीव्र निषेध केला आहे....

अलिबाग शासकीय कोविड रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल थळे यांच्यावर एका रूग्णाने (Patients) निर्घृणपणे हल्ला केला. त्यात सदर डॉक्टरांना आपला डोळा गमवावा लागल्याची घटना घडली.

दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी (Corona Crisis) सर्वजण झुंज देत आहोत अशातच डॉक्टरांवर हल्ला (Attack on Doctor) झाल्याने खळबळ उडाली आहे. थळे हे देखील प्रारंभापासूनच समर्पित कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

याप्रकरणी आयएमएने (IMA) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैद्यकीय व्यावसायिक गेल्या दीड वर्षांपासून कोविड आजारावर जीव धोक्यात घालून सातत्याने आणि अथकपणे संघर्ष करीत आहोत. वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय यावर हिंसाचार वाढत आहे. 'आयएमए'देखील वारंवार याबाबत आवाज उठवित आहे.

या घटनेचा देखील तीव्र निषेध आयएमएने केला आहे. हा हल्ला गुन्हेगारी स्वरूपाचा, अमानुष आणि अत्यंत निंदनीय असल्याचे आयएमए ने सांगितले. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात अशी कृत्ये करण्याचे धाडस कोणी करू नये. केंद्र सरकारने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाऱ्या हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे अशी मागणी अध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, सचिव डॉ पंकज बंदरकर, आणि अध्यक्ष कृती समितीचे डॉ राजेंद्र कुलकर्णी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com