
नाशिक | प्रतिनिधी Nashik
राजस्थान( Rajasthan) मधून अवैधरित्या (Illegally) आणलेल्या सात तलवारींसह( Swords) तिघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने सापळा रचत अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट १ चे अंमलदार विशाल देवरे यांना अमरधाम रोड वरील काजीची गढी येथे एका व्यक्तीकडे तलवार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
सदरहू माहिती त्यांनी वपोनी विजय ढमाळ यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रविंद्र बागुल, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, महेश साळुंके, प्रशांत मरकड, आप्पासाहेब गुंजाळ यांनी अमरधाम रोडवरील काझीची गढी येथे जावून संशयित विपुल अनिल मोरे (२८, रा. शितळा देवी चौक, काझीची गढी, म्हसोबा मंदिरासमोर, अमरधामरोड नाशिक) यास त्याच्या घरातुन ताब्यात घेतले.
संशियत व त्याच्या मित्रांनी बेकायदेशीर रित्या आणलेल्या तलवारी बाबत विचारपूस केली असता त्याने व त्याचे मित्र चेतन रमेश गंगवाणी (२६, रा. काझीची गढी, शितळादेवी चौक, अमरथामरोड नाशिक) , व गणेश राजेंद्र वाकलकर (२२, रा. काझीची गढी, शितळादेवी चौक, अमरधामरोड नाशिक) यांनी उज्जैन, मध्यप्रदेश येथे जावून ०७ तलवारी बेकायदेशीर रित्या आणल्या असल्याचे सांगितले. त्यापैकी ०४ तलवारी त्याचे राहते घरामध्ये व ०१ तलवार चेतन गंगावाणी याने त्याच्या राहत्या घरामध्ये व ०२ तलवारी गणेश वाकलकर याने त्याचे राहते घरामध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली. तिघा संशयितांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात ( Bhadrakali Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला.