'या' तालुक्यात अवैध धंद्यांना बसणार चाप

'या' तालुक्यात अवैध धंद्यांना बसणार चाप
USER

पुनदखोरे । वार्ताहर | Punadkhore

कळवण तालुक्यात (kalwan taluka) अवैध धंद्यावर (illegal occupation) चाप बसल्याने अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसाकडून (Nashik Rural Police) अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यासह ग्रामीण भागात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून अवैध धंदे करणार्‍यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

जिल्ह्यापाठोपाठ कळवण तालुक्यात सुद्धा गावठी दारूच्या हातभट्ट्या, जुगार अड्डे (gambling dens), मटके, सट्टा, अवैध वाळू उपसा (Illegal sand mining) आदी धंद्यावर वरिष्टांच्या आदेशाने कडक कारवाई करण्यात आली आहे. परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात काही महाभागांकडून आदिवासी बांधवाना (tribal community) हाताशी घेऊन त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पोलिसांबद्दल चुकीची माहिती सांगून पोलीस प्रशासनाची तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची (State Excise Department) बदनामी करण्याचे कारस्थान होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाबाबत चुकीची अफवा पसरविणार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याचा (nashik district) कार्यभार हाती घेताच जिल्ह्यात सुरु असणारे अवैध धंदयाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंद्यावर आळा घातला आहे.

जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच अवैध धंद्याचा (illegal occupation) नायनाट त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे कळवण तालुक्यात सुद्धा राज्य उत्पादन शुल्क व कळवण पोलिसांमार्फत तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत. परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे बंद होऊन सुद्धा काही महाभागांकडून राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाची बदनामी करण्याचे षड्यंत्र होत आहे.

आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करून बदनामी केली जात असल्याचे समजले आहे. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची बदनामी करणार्‍या महाभागांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, चांदवड या कार्यक्षेत्रात आम्हास प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर गावठी दारूच्या हातभट्ट्या चालविणार्‍यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, एका पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणार्‍यांवर कलम 93 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

- एस. के. सहस्त्रबुध्दे, निरीक्षक - राज्य उत्पादन शुल्क कळवण

वरिष्ठांच्या आदेशानुसार कळवण तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून जुगार, मटके, गुटखा विक्री, तसेच गावठी दारूच्या हातभट्ट्या आदी अवैध धंदे करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाबाबत चुकीची अफवा पसरवू नाही.

- समाधान नागरे, पोलीस निरीक्षक- कळवण पोलीस ठाणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com