
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवैधरीत्या मांसाची वाहतूक (meat) करणाऱ्यास नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चालकासह साडेआठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका संशयितास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सापळा रचून गरवारे पॉईंट येथून या संशयितास ताब्यात घेतले...
सय्यद इम्तियाज सय्यद फयाज (Syed Imtiaz Syed Fayaz) (वय ३५, रा. जुने नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे. सय्यद रविवारी (दि. १९) दुपारी अशोक लेलॅण्ड कंपनीच्या दोस्त (एमएच १५ जेसी ०९२३) या वाहनातून गोवंश प्राण्यांची कत्तल करून मांसाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी अंबड परिसरातील गरवारे पॉईंटजवळ सापळा रचून कारवाई केली.
दरम्यान, सय्यद याच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे गोमांस व इतर साहित्य जप्त करून त्याला अटक केले. गोमांसाची वाहतूक करण्यास मनाई असताना, तसेच कत्तल करण्यास निर्बंध असतानाही अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी सय्यदविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.