लाकडाची अवैध वाहतूक; वनविभागाकडून कारवाई

लाकडाची अवैध वाहतूक; वनविभागाकडून कारवाई

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात होणार्‍या अवैध लाकूड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाच्या चार गस्ती पथंकाद्वारे सटाणा रोड, सायने व करंजगव्हाण वनपरिक्षेत्र हद्दीत छापे टाकण्यात येऊन लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे चार टेम्पो जप्त करण्यात आले.

याप्रकरणी चौघा विरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह.तालुक्यातील वन हद्दीतून मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड करण्यात येऊन लाकडे अवैधरित्या मालेगावी आणले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार गस्ती पथके तैनात करण्यात आली होती. या पथकंद्वारे वेगवेगळ्या भागात गस्त घातली जात असताना चार टेम्पो संशयास्पद रित्या जात असल्याचे दिसल्याने वन अधिकार्‍यांनी ती थांबवून पाहणी केली असता या टेम्पोमध्ये आंबा, निम, शिरस या जातीच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने वन अधिकार्‍यांनी लाकडांचे चारही टेम्पो जप्त करत वन विभागाच्या आवारात आणण्यात आले.

लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या हुसेन अन्सारी कलीम अहमद सुभान, लाला अलीम सय्यद, अन्सारी अरसद हुसेन व सईद खान अहमद खान या चारही टेम्पोचालकांना अधिकार्‍यांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍यां विरुद्ध ही मोहीम यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे वन अधिकारी हिरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com