राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक तेजीत

वर्षभरात 'इतक्या' कोटींचा गुटखा जप्त
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक तेजीत

सातपूर | प्रतिनिधी Satpur

अन्न व्यावसायिकांनी कायद्यातील तरतुदींचे पालन करुन व्यवसाय करावा, जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अन्न औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration) सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे (Joint Commissioner Chandrashekhar Salunkhe) यांनी दिला आहे.

राज्यात बंदी असतानाही छुप्या मार्गाने गुटखा (Gutkha), पानमसाला (Pan Masala), सुगंधित तंबाखू (Tobacco), सुपारीची विक्री आणि वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करून वर्षभरात सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे माल सील करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिली

महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला वा तत्सम अन्नपदार्थ चोरीछुप्या मार्गाने राज्यात अवैधरीत्या (Illegally) आणून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) वेळोवेळी अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाइ करून या व्यावसायिकांची दुकान, टपर्‍या सीलबंद केल्या आहेत. तर काहींचा अन्न परवाना रद्द केला आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मागील वर्षभरात विविध 53 ठिकाणी छापे टाकून सुमारे 3 कोटी 67 लाख 6 हजार 837 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ सील केला आहे. त्यापैकी 44 व्यवसायीक ठिकाणे सीलबंद करण्यात आली, तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतूक करणारी 9 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com