कादवा नदीत रात्रीस खेळ चाले!

कादवा नदीत रात्रीस खेळ चाले!

ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या अवैध वाळूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे सध्या वाळू माफिया जोरात असून कमी खर्चात जास्त पैसा मिळत असल्याने सध्या वाळू माफियाचा धंदा तेजीत चालू असल्याचे चित्र कादवा परिसरात दिसत आहे.

कादवा नदी परिसरामध्ये होणा-यां या अवैध वाळू उपसायाला जबाबदार कोण या संदर्भात परिसरा मध्ये उलट सुलट चर्चा होत आहे. या अवैध वाळू उपसायामुळे नदीची पाणी पातळी खालवत असून नदीत मात्र खडक उघडे पडण्यास सुरवात झाली आहे.

वाळू माफियानां खालवत चाललेल्या पाणी पातळीशी काहीच देणे-घेणे उरलेले नाही. सध्या कादवा नदी पात्रात दिवसा वाळू उपसा न करता रात्रीच्या वेळी वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियानी धुमाकूळ घातला आहे प्रशासनाने या अवैध वाळू उपशाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कादवा नदीपात्रात कित्येक वर्षापासून अवैध वाळू उपसा चालू असून स्थानिक प्रशासन याकडे का दुर्लक्ष करित आहे संशोधनाचा विषय ठरत आहे हे वाळू माफिया स्थानिक गावकारभारी किवा गावातील गामस्थांनी विरोध करून सुध्दा अवैध वाळू उपसा बंद करित नाही त्यामुळे कादवा नदी पात्रात होणा-या वाळू उपशा मागे कुणाचे योगदान आहे या संदर्भात जोरदार चर्चा होत आहे.

या वाळू उपशा संदर्भात स्थानिक अधिकारी व कर्मचारी वर्गापर्यत अनेक वेळा तोंडी तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही उलट या परिसरामध्ये वाळू माफियाच्या सख्येत दिवसोदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

आशा वाळू माफियावर प्रशासन वचक निर्माण करणार का? असा प्रश्न परिसरातील जनतेला पडला आहे. स्थानिक प्रशसान जाणून बुजून या वाळू माफियाकडे दुर्लक्ष करते की काय? या संदर्भात प्रशसना विषयी उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. या अवैध वाळू उपशा विषयी दिंडोरी तहसिलदार पंकज पवार यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com