प्रतिबंधित वन्यजीवांची अवैधरित्या विक्री, नाशकातून एकास अटक

तीन दिवसांची वनकोठडी
प्रतिबंधित वन्यजीवांची अवैधरित्या विक्री, नाशकातून एकास अटक
USER

नाशिक । Nashik

नाशिक (Nashik) शहरातील द्वारका परिसारत (Dwarka Area) (दि.२५) रोजी वन्यजीव अवयवांची विक्री (prohibited wildlife) करणाऱ्या संशयितास अटक (One Arrested) करण्यात आली आहे. या संशयिताकडून घोरपड या वन्यजीवाच्या अवयव जप्त करण्यात आले आहे.

द्वारका परिसरातील भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयित धर्मा पवार(२४, त्र्यंबकेश्वर) (Dharma Pawar) यास हा विक्रीसाठी उभा होता. यावेळी गुप्त बातमीवरून पश्चिम भाग वनविभागातील (Nashik Forest Department) नाशिक वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्त पथक व वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी यांनी सापळा रचून तात्काळ या संशियीतास ताब्यात घेतले.

दरम्यान या संशयितास ताब्यात घेतल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी (Forest closet) सुनावली आहे. पश्चिम भाग नाशिक वनविभागातर्फे पुढील तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com