पोलीस मुख्यालयामागेच अवैध मद्य विक्री

पोलीस मुख्यालयामागेच अवैध मद्य विक्री

नाशिक | Nashik

आडगाव ग्रामिण पोलीस मुख्यालयाच्या पाठिमागेच हॉटेल दख्खन दरवाजा येथे बेगायदेशीर रीत्या देशी विदेशी मद्याची विक्री केल्या प्रकरणी छापा मारून आडगाव पोलीसांनी ३ हजाराचे मद्य जप्त केले आहे.

निलेश भगावान जगताप (४२, रा. धात्रकफाटा, आडगाव शिवार) या हॉटेल चालकास पोलीसांनी अटक केली आहे.

ग्रामिण पोलीस मुख्यालयाच्या पाठिमागेच असलेल्या हॉटेल दख्खन दरवाजा येथे अवैद मद्य विक्री होत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून ३ हजार १२० रूपयांच्या प्रिंन्स संत्रा, मॅकडॉल, ब्लेंडर प्राईड अशा बाटल्या जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बस्ते करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com