अंबड परिसरात अवजड वाहनांची अवैध पार्किंग; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

नागरिकांना करावा लागत आहे अडचणींचा सामना
अंबड परिसरात अवजड वाहनांची अवैध पार्किंग;  वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

नवीन नाशिक | प्रतिनिधी

अवजड वाहनांच्या अवैध पार्किंग (Illegal parking of vehicles)मुळे प्रभाग क्रमांक ३६ येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे वाहतूक शाखेने (Transport Department)उघडपणे डोळेझाक केल्याने भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अंबड (Ambad )गावानजीक असलेल्या द कंफर्ट झोन सोसायटी (The Comfort Zone Society) व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. यापरिसरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेला रस्त्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपूर्वी मार्गी लागला. अशातच याठिकाणी असलेल्या काही व्यावसायिकांनी सदरहू रस्त्यावरच अवैधरित्या अवजड वाहने उभी केल्याने येथून मार्गक्रमण करणाऱ्या रहिवाशांना दररोजच जीवव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.

सकाळी मुलांच्या शाळेच्या वेळात देखील येथे वाहने उभी असल्याने विध्यार्थ्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी दररोजच लहान मोठे अपघात सदरहू अवैध अवजड वाहनांमुळे होत आहेत.

येथे झालेल्या अपघातांची जरी पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी येथे होणाऱ्या अपघातांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रश्नाकडे वाहतूक शाखेने गांभीर्याने लक्ष देऊन सदरहू अवैध पार्किंग करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com