
वावी | संतोष भोपी | Vavi
सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinner-Shirdi Highway) गोवंशाचा भरलेला ट्रक सिन्नर तालुक्यातील वावी (Vavi) येथे बजरंग दल व पांगरीतील सुंदराबाई गोशाळा येथील कार्यकर्त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या (Police) हवाली केला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर-शिर्डी महामार्गावरून एक ट्रक जात असतांना त्यातून वास येऊ लागल्याने वावीतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी (Bajrang Dal Workers) ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने पळवू लागल्याने अधिक संशय बळावला. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवून पोलिसांना बोलवत पोलीस ठाण्यात आणली. तेव्हा त्यात गोवंश (Bovine) असल्याचे दिसले.
दरम्यान, याप्रकरणी गाडीतील वाहनचालक जावेद समीर पठाण (२४) साहिल युनीस सय्यद (१९) सादिक युनिस सय्यद (१७) साहिल पासू सय्यद (१४) समीर पासु सय्यद (१७) शाहरुख यूनिस सय्यद (२१) आदींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते (PI Sagar Kote) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दशरथ मोरे तपास करत आहेत.