गावठी दारूचा अड्डा उध्वस्त

गावठी दारूचा अड्डा उध्वस्त

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यात अवैधधंदे व गावठी दारू अड्डे खपवुन घेतले जाणार नाही अशी तंबीच नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक राजु सुर्वे (Police Inspector Raju Surve) यांनी दिल्याने अवैधधंदे व गावठी दारू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवळखेड शिवारातील रेरेवाडी जवळील झोती नावाच्या पाण्याच्या ओहळात जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचे काम सुरु होते.

गावठी दारूचा अड्डा उध्वस्त
राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

याची माहिती इगतपुरी पोलीसांना समजताच पोलीस अधिक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap), अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी पथकासह या ठिकाणी धाव घेत या जंगलात छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे रसायन जागेवरच नष्ट केले.

पोलीसांची चाहुल लागताच दारू बनवणाऱ्या संशयितांनी पळ काढला. दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत असुन या कारवाईत, छाप्यात गावठी दारू (Illegal liquor) तयार करण्यासाठी लागणारे १८ हजार रूपयाचे ७२० लीटर रसायन व हजारो रुपयांचे साहित्य जागेवरच नष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या कारवाईत पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस हवालदार हरीदास लोहरे, दिपक पटेकर, विठ्ठल झिरवळ आदींनी सहभाग घेतला असुन अज्ञात आरोपींविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com