पिंपळगावला परराज्यातील ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त

पिंपळगावला परराज्यातील ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त

निफाड | प्रतिनिधी | Niphad

येथील टोलप्लाझावर परराज्यात विक्री केला जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...

याबाबत माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईचे संचालक डॉ. विजय सूर्यवंशी, सुनील खाते, नाशिकचे उपविभागीय अधीक्षक अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत गर्जे, उप अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी नाशिक- पिंपळगाव रोडवरील टोलनाका येथे सापळा रचला.

वाहन तपासणीत एका तपकिरी रंगाच्या आयशर कंपनीच्या वाहनात (क्र. एमएच - ०४ - एचडी - १३१७) असलेला परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. वाहनचालक रविशंकर सुखराम पाल यास अटक करण्यात आली आहे.

पिंपळगावला परराज्यातील ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त
महिलांसाठी गुड न्यूज! आजपासून ST प्रवासात ५० टक्के सवलत

वाहनातून किनारेश रॉयल प्रिमीयम व्हिस्कीचे १८५ बॉक्स, डिएसपी ब्लॅक डिलक्स विस्कीचे ४२ बॉक्स, बर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बिअरचे ८० बॉक्स, हायवर्डस ५००० चे ९६० टिन, विराबुम सुपरस्ट्रॉंगचे ७२० टिन बॉक्स, ६ प्लॅस्टिकच्या यान कँपच्या गोण्या, एक ओ कंपनीचा एड्रॉंईड मोबाईल व एक साधा मोबाईल असा एकूण ३१ लाख ४२ हजार ८४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पिंपळगावला परराज्यातील ३१ लाखांचा मद्यसाठा जप्त
कोटंबी घाटात ट्रक उलटला

ही कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, एस. व्ही. देशमुख, जवान दीपक आव्हाड, विलास कुवर, एम.सी. सातपुते, पी. एम. वाईकर, सचिन पोरजे, गणेश शेवगे, सोमनाथ भांगरे, दीपक नेमणार, आण्णा बहिरम, गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे तपास करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com