
नाशिक | Nashik
सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) ताहाराबाद अंतापूर चौफुलीवर (Taharabad Antapur Chauphuli) जायखेडा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत १२ लाख २७ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे...
याबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, सटाण्याकडून पिंपळनेरकडे (Satana to Pimpalner) जाणाऱ्या कंटेनरला (जी.जे. १५ एव्ही ६२१८ ) ताहाराबाद अंतापूर चौफुलीवर सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण पारधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून अडविले.
यावेळी पोलिसांनी (Police) कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी कंपनीचा १२ लाख २७ हजार रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा ( illegal liquor Stock) आढळून आला. त्यानंतर याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaikheda Police Station) मद्याची विना परवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap)अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस हवालदार सुनील पाटील, पोलिस नाईक उमेश भदाणे, योगेश श्रीरसागर, पृथ्वीराज बारगळ सोनवणे यांच्यासह आदीनीं केली.