नाशकात लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशकात लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य उत्पादन शुक्ल विभागाने (State Excise Department) सातपूर (Satpur) येथे आयशर ट्रकमध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्या वाहनावर कारवाई करत तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...

राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक निरीक्षक सुनील देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे आज (दि १९) गुरुकृपा हॉटेलसमोर त्र्यंबक-नाशिक रोडवर सापळा लावून परराज्यानिर्मित अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकला ताब्यात घेण्यात आले.

या ट्रक (क्र. एम.एच.१५ जी.व्हि. ७९१४) मध्ये महाराष्ट्र राज्यात विकीस प्रतिबंधित असलेली व दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेला ट्रक सह 30 लाख रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या दरम्यान संशयित कामिम इमरान उददीन अहमद आणि दिपक गणपत रोकडे यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अवैध मद्यसाठ्याचे २०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत निरीक्षक सुनील देशमुख, निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, एम. आर. तेलंगे, सदुनि. हेमंत नेहरे जवान, किरण कदम, गोकुळ परदेशी, विजेंद्र चव्हाण, रमाकांत मुंडे यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com