तीनचाकीतून गावठी मद्याची विक्री; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

तीनचाकीतून गावठी मद्याची विक्री; ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
USER

नाशिक | प्रतिनिधी

चुंचाळे परिसरातील कारगिल चौक येथे दोन रिक्षांमधून गावठी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. अंबड पोलीसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ रिक्षा व गावठी दारूचे कॅन असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे...

विशाल संजय भदरगे (२०, रा. बुद्धविहार जवळ, गरवारे पॉइंट) व संदिप युवराज सैदाणे (२५, रा. दत्तनगर, चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळेच्या कारगिलचौक परिसरात दोन रिक्षातून गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

त्यानुसार छापा टाकून रिक्षांंची तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com